युवकांनी व्यसनापासून अलिप्त राहावे - मारुती बनसोडे
देशभक्त न्युज - नळदुर्ग प्रतिनिधी / -
आज फार मोठ्या प्रमाणात व्यसनामुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे.विशेषतः युवा पिढी अनेक व्यसनाना बळी पडत आहेत त्यामुळे पुढे होणारा विनाश टाळण्यासाठी युवकांनी व्यसनापासून अलिप्त रहावे असे आवाहन नशा बंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, चे धाराशिव जिल्हा संघटक मारुती बनसोडे यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि. प. उस्मानाबाद, येडाई व्यसमुक्ती व उपचार केंद्र येरमाळा आणि गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात दि.६/१०/२०२३ रोजी व्यसमुक्ती सप्ताह निमित्त युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. हरिश्चंद्र गायकवाड होते. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संदिप तांबारे,डॉ. मोरे परंडा, प्रा. तुषार वाघमारे, इत्यादी उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित पाहुण्यांनी भाषणे केली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. रणजित वरपे यांनी केले या कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थिनी मिळून जवळपास एकशे दहा विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होतेहा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. अमर गोरे पाटील,प्रा. विशाल जाधव,प्रा. प्रकाश मिसाळ प्रा. कोपणार सर यांनी परिश्रम घेतले
