ईटकूर जिप . प्रशालेच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रिकेट खेळासाठी निवड
कर्ण फाउंन्डेशन च्या वतीने यशस्वी १५ खेळाडुंना क्रिकेट कपड्यांचे किट वाटप व शुभेच्छा .
देशभक्त न्युज - ईटकूर प्रतिनीधी / -
जिल्हा क्रिडा विभाग धाराशिव च्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेटस्पर्धेसाठी ईटकूर जिल्हा परिषद प्रशालेच्या विधार्थी खेळाडु टिमची निवड झाली असुन या यशस्वी विद्यांर्थ्यांना येथील " कर्ण फाउंडेशन " च्या माध्यमातुन क्रिकेट खेळासाठी लागणारा टि शर्ट , पँन्ट असे किट देण्यात आले .
जिप. प्रशालेतील शालेय क्रिकेट टीम तालुकास्तरीय क्रिकेटचा अंतिम सामना जिंकल्यामुळे या संघाची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे . यामुळे जिल्हापरिषद प्रशालेत निवड झालेल्या सर्व गुणवंत खेळाडु विद्यार्थ्यांचे अभिनंदन या कार्यक्रमाचे प्रशालेच्या वतीने आयोजन करण्यान आले होते . या १५ खेळाडुंना प्रोत्साहनपर टी -शर्ट व पँट असे आकर्षक क्रिकेट कीट सदैव सामाजिक उपक्रमात पुढाकार घेवून कार्य करणारे कर्ण फांउन्डेशन ईटकूर च्या माध्यमातुन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक गुजर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये देण्यात आले . संपन्न झालेल्या कार्यक्रमावेळी फाउंन्डेशन चे कार्यकर्ते , व प्रशालेचे मुख्याध्यापक , शिक्षक वर्ग विद्यार्थी यांनी सर्व निवड झालेल्या खेळाडुंना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
