लोहारा नगरपंचायत बोगस गुंठेवारी व होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी समिती नेमून दोषीवर गुन्हे दाखल करण्याची आरपीआय (आ . ) गटाची मागणी
देशभक्त न्युज - धाराशिव प्रतिनीधी / -
लोहारा नंगरपंचायत बोगस गुंठेवारी व निकृष्ट दर्जाचे विकास कामे होत आहेत या प्रकरणी चौकशी समीती नेमनुक करुन दोषीवर गुन्हे दाखल करावे तसेच मौजे वडगाव ( सि) ता . जि . धाराशिव येथिल गट नं ३८१ गावठाण येथे दलीत व बौद्ध समाजाने राहण्यासाठी जागा उपलब्ध करूण देने बाबत जिल्हाअधिकारी यांना आर .पी. आय आठवले गट धाराशिव च्या वतिने देण्यात आले या निवेदना मध्ये असे नमुद केले आहे कि मौजे लोहारा (बु) येथील नगरपंचायत येथे गुंठेवारी प्रकरण असे या शासनामार्फत होणारे सिमेंट रोड, नगरपंचायत इमारत बांधकाम, नाना नानी पार्क कामे ही निकृष्ट दर्जाचे व बोगस कामाच्या अनेक तक्रारी प्राप्त झाले आहेत लोहारा येथील स.न. 164 प्लॉट नं. 46 या जागेचा कब्जा नसताना व कोर्ट प्रकरण असताना गुंठेवारी करुन दिले आहे.
तरी सदर जागेच्या प्रकरणी लोहारा न्यायालय व उच्च न्यायालय औरंगाबाद येथे प्रकरण चालू आहे व न्यायप्रविष्ठ असुन गुंठेवारी करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार गुंठेवारी न करता राजकीय दबावाखाली व पैशाच्या अमिशाला बळी पडुन हे गुंठेवारी करण्यात आले आहे. तरी सदर प्रकरणी चौकशी समिती नेमुन योग्य ती चौकशी करावी व दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल करावे या प्रकरणी जिल्हाधिकारी साहेब यांनी स्थळ पाहणी अहवाल मागवावे सदर प्रकरणात ज्याला गुंठेवारी प्रमाणपत्र देण्यात आले त्यांच्या ताबाच नाही किंवा कोर्ट प्रकरण चालु आहे असा प्रकरणात गुंठेवारी करता येत नाही तरी सदर प्रकरणाची गांभीर्याने तात्काळ चौकशीचे आदेश देण्यात यावे व दिलेले गुंठेवारी आदेशावर स्थगती देण्यात यावी व दोषीवर गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच मौजे वडगांव (सि.) ता.मि. याशिव येथील गट नं. ३८१ गावठाण या जागेत सन २०२० पासून वास्तव्यास आहोत. तरी राहत असलेली जागा अपुरी असल्याने आम्हास गट नं. ३८१ मधील जागा उपलब्ध करून देण्यात यावी.सदरची जागा आमच्या नांवे नसल्यामुळे इतर शासकीय सोयी-सुविधा आम्हास मिळत नाहीत व आडथळा निर्माण होत आहे. तसेच मुळ गावात राहण्यासाठी जागा तुटपुंजी असल्याने जागा अपुरी पडत आहे. तरी गट नं.३८१ मधील जागा गट नं.३८१ मध्ये आते कमांक ४३६९ वरती ७/१२ वरती गावठाण विस्तार योजनेसाठी संपादीत क्षेत्र असाही उल्लेख असल्याने सदरची जागा आम्हाला देण्यात यावी. आमच्या
नावे करण्यात यावी अन्यथा आर.पी.आय (आ) च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर आर.पी.आय जॉइंट सेक्रेटरी तथा जिल्हाध्यक्ष धाराशिव राजाभाऊ ओव्हाळ,संपतराव जानराव,सोमनाथ गायकवाड,भालचंद्र कठारे,रुपेश मोटे,उदयराज बनसोडे,मुन्ना ओव्हाळ , मुकेश मोटे , आकाश इंगळे इत्यादींचे स्वाक्षऱ्या आहेत.
