Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जिल्हापरिषद विद्यामंदीर आंदोरा शताब्दी महोत्सव सोहळ्या निमित्तानं शाळेतील माजी व आजी शिक्षकांचा गौरव कार्यक्रम संपन्न

  जिल्हापरिषद विद्यामंदीर आंदोरा शताब्दी महोत्सव सोहळ्या निमित्तानं शाळेतील माजी व आजी शिक्षकांचा गौरव कार्यक्रम संपन्न

 


देशभक्त न्युज कळंब प्रतिनीधी / -

आंदोरा येथे दिवसभरात शताब्दी महोत्सवात सहभाग नोंदवलेल्या सर्व वर्गमित्र रमले एकमेकांना शुभेच्छा देण्यात व विचारपुस मध्ये विविध उपक्रमांनी नटलेला आगळा-वेगळा ऐतिहासीक महोत्सव सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडला.आपल्या batchला अध्यापन केलेले अनेक जुने शिक्षक आवर्जुन उपस्थित होते.त्यात शेटे यांनी प्रत्यक्ष क्लास घेऊन अनेकांची मने जिंकली. वर्गात प्रवेश करताच सर्व माजी विद्यार्थ्यांनी 'एक साथ नमस्ते' करुन सरांनी sit down ची आज्ञा दिली.व अध्यापनास सुरुवात केली.सरांनी इतिहास शिकवताना अंगावर शहारे आले.आपण अजुनही सरांचे विद्यार्थीच आहोत,ही feeling प्रकर्षाने उपस्थितांना जाणवले .

   एकंदरीत शताब्दी महोत्सवात अनेक स्टॉल्सची उभारणी करण्यात आली होती.यात आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेकी महीला बचत गट,येडाई व्यसनमुक्ती केंद्र येरमाळा,स्वामी विवेकानंद वाचनालय,कृष्णा हॉस्पिटल मोफत सर्वरोगनिदान शिबीर यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच तथा डिसीसी संचालक बळवंत तांबारे,प्रमुखउपस्थितीअशोक तांबारे,माणिक(काका)कवडे,कैप्टन कमलाकर तांबारे हे होते.तर प्रमुख पाहुणे दयानंद जटकुरे (प्राचार्य डायट,धाराशिव),संतोष राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी फुलारी डॉ.संदीप ताांबारे,उपसरपंच दत्ता तांबारे,आदिनाथ कवडे अध्यक्ष शा.व्य.समिती हे  होते.

 यानंतर सर्व आजी माजी शिक्षकांचा आंदोरा ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांनी शाल ,पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला .

प्रास्ताविक बाळकृष्ण तांबारे(राष्ट्रीय उपाध्यक्ष म.रा.प्रा.शि.संघ) यांनी केले.तर मनोगत  राजाभाऊ कदम(तहसिलदार,देगलुर),अमोल बाभळे ,यांनी व्यक्त केले. जटकुरे , संतोष राऊत यांनी मार्गदर्शन केले.यानंतर आपल्या रांगड्या शैलीत डॉ.संदीप तांबारे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन सर्वांना लाभले.अधुन मधुन जि.प.शाळेच्या मुली आपल्या टिपरी नृत्याचा अविष्कार घडवित   आकर्षित करत होत्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  विद्या वैद्य,डॉ.रेवती घाडगे ,श्रीकांत तांबारे , प्रदीप लोंढे यांनी संयुक्तरित्या केले.तर मदन तांबारे यांनी सर्वांचे मन:पुर्वक आभार मानले.

   यानंतर सर्वांनी दही,धपाटे,शेंग.चटणी,ठेचा,,मसाला राईस इ . स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.