Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जात्यावरील ओव्यांची परंपरा जपणा-या महिलांचा इटकळ येथे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान





शाहिरांच्या गीतांनी कवीच्या काव्यांनी सभागृह मंत्रमुग्ध,तर जात्याची घरघर ठरली लक्षवेधी 

देशभक्त न्युज -नळदुर्ग  - सुहास येडगे यांजकडुन

तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील संत तुकाराम सामाजिक संस्था  व ग्लोबल व्हिलेज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बोरामणी यांच्या संयुक्त विद्यमाने इटकळ येथील साई मंगल कार्यालयात जात्यावरील ओव्यांची परंपरा जपणा-या आधुनिक बहिणाबाईचा सन्मान कवयित्री बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मा मधुकरराव चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक,कवी व विचारवंत योगीराज माने, महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबईचे सदस्य उमाकांत मिटकर,शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रामचंद्र आलुरे, जवाहर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उमाकांत चनशेट्टी, एम डी देशमुख,सेवानिवृत्त प्राचार्य प्रा संगमेश्वर जळकोटे, हभप दिंडेगावकर महाराज ,कवयित्री कविता पुदाले, प्राचार्य आसमा नदाफ,लताबाई काळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती 


या पुरस्कार सोहळ्यामध्ये कांताबाई शिंदे (संभाजीनगर), सुशिलाबाई हुकीरे (केशेगाव) सुलाबाई सरवदे (येवती),गवळण बांगर (बांगरवाडी) कस्तुराबाई देडे (सांगवी बु) उषा देशमुख (धाराशिव), अंबुबाई कसबे (येवती) भिवराबाई थोरात (नळदुर्ग), सुमित्रा घुगे (अणदूर) अनघा ओवरीकर (तुळजापूर), मुक्ताबाई सारणे (चिवरी), अनुराधा उपासे (मंगरुळ), कमलबाई घुगे (अणदूर),सिमा वाघमारे (येवती),पद्माबाई रेवगे (अणदूर) या  महिलांचा  राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला 


या कार्यक्रमात भिमशाहीर नागनाथ दुपारगुडे, यशवंत कांबळे व कवी प्रदीप पाटील,प्रबोध कांबळे यांच्या प्रबोधनपर गीतांनी व काव्यांनी सभागृह मंत्रमुग्ध झाले तर पुरस्कारप्राप्त महिलांनी आपल्या पारंपारिक जात्यावरच्या ओव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले, जात्यावरील घरघर ऐकुन सभागृह भाराऊन गेले


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ संतोष पवार यांनी केले, प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक दयानंद काळुंके यांनी केले तर आभार मल्लीनाथ जळकोटे यांनी मानले

या कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त सन्मानपत्राचे वाचन पत्रकार दिनेश सलगरे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विलास काळुंके,डॉ प्रसन्न कंदले, संजिव आलूरे,सिध्दाराम जळकोटे,केशव गायकवाड, सचिन तोग्गी, नामदेव गायकवाड,प्रबोध कांबळे, शशिकांत गवळी सिध्देश्वर भालेराव,महेश कसबे, स्वप्नील भालेराव, मंगेश कसबे, गौरव काळुंके यांनी पुढाकार घेतला होता

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.