देशभक्त न्युज - परंडा प्रतिनिधी / -
२६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधुन येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया परंडा पक्ष कार्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या थाटामाटात साजरे करण्यात आले यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माजी नगरसेवक संजयकुमार बनसोडे आणि पूज्य नगरीचे संपादक निसार भाई मुजावर ,भजनदास गुडे, नुरजा शेख याच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी उपस्थित परांडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचांलक विजयकुमार बनसोडे , परंडा तालुका अध्यक्ष फकीर सुरवसे ,आयटी सेल जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे ,उत्तम ओव्हाळ , संजीवन भोसले, दादासाहेब सरोदे ,हरिभाऊ अडाळे ,निलेश गायकवाड ,प्रीतम ओव्हाळ ,अविनाश ओव्हाळ , शिवाजी बनसोडे, नितीन चौधरी , प्रज्वल बनसोडे, श्याम गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
