ईटकूर येथे संविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा
देशभक्त न्यूज - ईटकूर प्रतिनिधी / -
येथील बुद्ध विहारात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून समाज बांधवांनी एकत्रित जमून संविधान दिन मोठ्या हर्षाने साजरा केला या वेळी जगाला शांततेचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिलेचे धुपाने पुष्पाने मेनबत्ती प्रज्वलीत करुन पुजा रत्नपाल गांधले यांच्या हस्ते करण्यात आली . यावेळी उपस्थित समाज बांधवाकडुन बुद्ध पाजा पाठाचे पठण करण्यात आले .
सदर कार्यक्रमास आदित्य रणदिवे , रुपेश ओव्हाळ , लखन रणदिवे , संतोष शिंदे , सुयश रणदिवे ,सोहेल लगाडे ,सचिन शिंदे आदीसह मोठ्या संख्येने भिमनगर मधील समाज बांधव उपस्थित होते.
