Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर असणारे आदर्श व्यक्तीमत्व -पै.श्री.काळुराम पांडुरंग लांडगे

 सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर असणारे आदर्श व्यक्तीमत्व -पै.श्री.काळुराम पांडुरंग लांडगे 

व्यक्तीविशेष .....




  देशभक्त न्युज - पुणे 

लांडगे परिवार घराणे पुर्वजांपासुन नेहमी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे.वडिल कै.पांडुरंग सखाराम लांडगे हे पाचजण मिळून सहा भावांचा विस्तार आमचे वडिल हे सर्वात मोठे पुर्वी सर्व भावांनी मिळून कासारवाडी मध्ये डिस्टिक स्कुल बोर्डला तीन गुंठे जागा बक्षीस दिली होती.त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेऊन सामाजिक क्षेत्राची आवड निर्माण झाली लांडगे परिवार म्हणजे पिंपरी-चिंचवड व पुणे शहर ह्या पंचक्रोशीत शेतकरी व पैलवान क्षेत्रातील असणारे नावाजलेले घराणे                   त्याच योगायोगाने मला पिंपरी-चिंचवड मुन्सिपल ट्रान्सपोर्ट ( PCMT ) मध्ये १ जानेवारी १९८७ ला वाहक ( कंडक्टर ) या पदावर नोकरी लागली.त्यानंतर पुढील काळात सन २००७ मध्ये पुणे व पिंपरी चिंचवड यांच्या दोन्ही संस्था PMT व PCMT मिळून पुणे महानगर परिवहन महामंडळ ही संस्था म्हणजेच आताची PMPML ही संस्था उदयास आली नोकरीला लागायच्या अगोदर सामाजिक , धार्मिक , क्रिडा , सांस्कृतिक , शैक्षणिक व राजकिय गोष्टींची आवड आमच्या कुटुंबातच पहिल्या पासून कुस्तिचा छंद वडील पैलवान असल्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात मौजे भोसरी- कासारवाडी पैलवांनांचे माहेरघर म्हणुन ओळखले जायचे ह्या परिसरात प्रत्येक घरात पैलवान असायचे त्यानंतरच्या काळात मी स्वःता ०७ मे १९९३ रोजी वस्ताद कै.राघोबा लांडगे , कै.तानाजी लांडगे , कै.श्रीपती उर्फ चिंधु लांडगे , कै.शंकर लांडगे यांच्या स्मरणार्थ व सुदर्शन तरूण मंडळ यांच्या विद्यमाने  *" पिंपरी- चिंचवड केसरी "* *कुस्ती स्पर्धा कासारवाडी मध्ये भरविली होती त्यावेळी उदघाटण सांगली जिल्हाचे खासदार हिंदकेसरी पै.मारुती माने व रुस्तुम ए हिंद पै.हरिश्चंद्र बिराजदार यांच्या शुभहस्ते केले होते* *तीन दिवस चाललेल्या कुस्तीचा बक्षीस समारंभ ०९ मे १९९३ रोजी महाराष्ट्र राज्याचे  महसुलमंत्री विलासरावजी देशमुख  व मा.खासदार प्रा.रामकृष्णजी मोरे सर तसेच मा.महापौर तात्यासाहेब कदम , नगरसेवक श्री.रंगनाथ फुगे , पै.दशरथ ज्ञानोबा लांडगे , श्री.सदाशिव शंकर धावडे मास्तर तसेच आमचे चुलते श्री.खंडु सखाराम लांडगे , श्री.तुकाराम सखाराम लांडगे , श्री.सदाशिव सखाराम लांडगे , पै.सहादु सखाराम लांडगे , कै.पंढरीनाथ सखाराम लांडगे* *यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणुक व फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यक्रम* *पार पडला.आमचा परिवार मोठा व शेतकरी कुटुंब  असल्याने घरची जबाबदारी लवकरच मला संभाळयला लागल्यामुळे  दहावी पर्यंतच शिक्षण घेता आले.* *आमचे कुटुंब सामाजिक कार्यात असल्यामुळे योगायोगने मला प्रवाशांची सेवा करण्याची पुन्हा म्हणजेच कनडक्टरची नोकरी लागली लागली* *त्या मध्ये प्रवाशांच्या हरविलेल्या व गहाळ झालेल्या मौल्यवान वस्तु , पाकिटे , मोबाईल , बॅगा , मनीपर्स अशा अनेक वस्तु प्रवाशांना परत केल्या तसेच काही नागरिक ३१ डिसेंबरला दारु ( अल्कोहल ) पिऊन ३१ डिसेंबर साजरा करतात आम्ही बसस्थानका मध्ये प्रवाशांना दुध देऊन साजरा करून प्रवाशांना चांगला संदेश द्यायचा*    , *आरोग्य शिबिर , रक्तदान शिबिर , डोळे तपासणी शिबिर , शिवजयंती उत्सव , कारगील युद्धा , पुलोवामा येथे आपले सैनिक मारले गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्याचे कार्यक्रम असे अनेक उपक्रम कामगारांच्या अधिकारी व  सहकार्याने करत असे* *ह्याच कार्याची दखल म्हणुन PMPML प्रशासानाने २६ जानेवारी २०२० रोजी स्वारगेट येथे PMPML चे अध्यक्ष व संचालक मा.नयना गुंडे मॅडम यांच्या शुभहस्ते* *गुणवंत कामगार म्हणून सन्मानीत करण्यात आले तसेच त्यानंतर बर्‍याच संस्थांनी , जिल्हास्तरिय , राज्यस्तरिय , राष्ट्रीय पातळीवर असे अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले* *याच कार्याची दखल म्हणुन १९ एप्रिल २०२२ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र शासनाने कामगारमंत्री  मा.हसन मुश्रीफ साहेब व कामगार राज्यमंत्री मा.बच्चु कडु साहेब* *यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र राज्याचा गुणवंत कामगार म्हणुन सन्मान करण्यात आला.आज पर्यंत ३५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.* *हे पुरस्कार मिळण्यामागे सर्वांत सिंहाचा वाटा म्हणजे हवेली तालुक्याचे मा.आमदार व पिंपरी-चिंचवड शहराचे प्रथम महापौर मा.ज्ञानेश्वर लांडगे साहेब , दिवंगत आमदार कै.लक्ष्मणभाऊ जगताप , आमदार पै.महेशदादा लांडगे , मा.नगरसेवक, पिंपरी चिंचवड शहराचे भाजपाचे शहरध्यक्ष श्री.शंकरशेठ जगताप , पिंपरी चिंचवड शहर कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष वस्ताद हनुमंतराव गावडे , महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण ,* *तसेच PMPML चे सर्व प्रशासक अधिकारी , सर्व कामगार संघटना , कामगार वर्ग , नातेवाईक , मित्र परिवार व सर्व पत्रकार बंधु व इंटरनेट प्रसार माध्यम यांच्याच सहकार्यामुळे व मार्गदर्शनामुळेच आज पर्यंत मी ह्या शिखरावर पोहचु शकलो

 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी त्यांना पिंपरी चिंचवड उत्कृष्ट कामगार गुणगौरव पुरस्कार 2023 जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे पोलीस उप आयुक्त डॉ राज खतीब छत्रपती आवर्ड विजेते राजेश इरले प्रसिद्ध उद्योजक भरत वाल्हेकर सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संजय मराठे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. तसेच महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट समजला जाणारा छत्रपती राष्ट्रीय पुरस्कार देखील त्यांना जाहीर झालेला आहे. तो डिसेंबर महिन्यात  त्यांना मुंबई या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.