Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सिद्धार्थ बनसोडेचे युपीएससी परीक्षेत घवघवीत यश

युपीएससी परिक्षेत बनसोडे देशात ९६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण

 


देशभक्त न्युज - नळदुर्ग प्रतिनीधी / -

 नळदुर्ग येथील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. शिवाजी बनसोडे व सोलापुर येथील आदर्श हायस्कुलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. निनु बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिवाजी बनसोडे हा नुकत्याच झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत घवघवीत यश संपादन करून देशात ९६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. सिद्धार्थ बनसोडे यांनी मिळविलेल्या या दैदीप्यमान यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे.

      सिद्धार्थ बनसोडे यांने "भारतीय अभियांत्रिकी सेवा (इंजिनिअरींग सेवा)" ची परीक्षा दिली होती.त्यामध्ये त्याला हे यश मिळाले आहे.तो सोलापुर येथील सिद्धेश्वर इंग्लिश मिडीयम स्कुलचा विद्यार्थी आहे.इयत्ता अकरावी आणि बारावी फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे व अभियांत्रिकीचा अभ्यास मुंबई येथील के. जे. सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालयातुन शिक्षण पुर्ण केले आहे.त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा पास होऊन बी. एस. एन.एल. मध्ये ज्युनिअर इंजिनिअर म्हणुन काम केले आहे.त्याचबरोबर रेल्वे खात्यातसुद्धा स्पर्धा परीक्षा पास होऊन ज्युनिअर इंजिनिअर म्हणुन सेवा केली आहे.सध्या तो स्पर्धा परीक्षा पास होऊन चेन्नई येथे डी. आर. डी. ओ.(संरक्षण संशोधन व विकास संस्था) येथे शास्त्रज्ञ म्हणुन कार्यरत आहे.हे करीत असतानाच त्यांनी युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.

       सिद्धार्थ बनसोडे यांनी मिळविलेल्या या यशाने ऐतिहासिक नळदुर्ग शहराचे नावलौकिक देशात झाले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.