देशभक्त न्युज - नळदुर्ग प्रतिनीधी / -
भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या प्रमुख मागणीसह जालना येथे आमरण उपोषणास बसलेले समाजाचे नेते दीपक रणनवरे यांच्या समर्थनार्थ व प्रशासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी दि.३० नोव्हेंबर रोजी नळदुर्ग येथे न.प.कार्यालयासमोर नळदुर्ग व परीसरातील सर्व शाखीय ब्राम्हण समाजाच्या वतीने नळदुर्ग शहर सर्व शाखीय ब्राम्हण समाज संघटनेचे अध्यक्ष विनायक अहंकारी यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणामध्ये ब्राम्हण समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. शहरातील अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी येऊन या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे,बालवाडी ते पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळावे, इनामी जमिनी हक्क परत मिळावेत, पुरोहितना मासिक ५ हजार रुपये मानधन मिळावे, ब्राम्हण समाजाच्या सुरक्षततेसाठी विशेष कायदा करून सामाजिक विडंबनातुन मुक्तता करावी या मागण्यांसह इतर मागण्यांसाठी तसेच जालना येथे याच मागण्यांसाठी आमरण उपोषणास बसलेले समाजाचे नेते दीपक रणनवरे यांना पाठिंबा म्हणुन दि.३० नोव्हेंबर रोजी नळदुर्ग येथे न.प.कार्यालयासमोर नळदुर्ग व परीसरातील सर्व शाखीय ब्राम्हण समाजाच्या वतीने समाजाचे नेते विनायक अहंकारी यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
या उपोषणामध्ये विनायक अहंकारी यांच्यासह मुकुंद नाईक, प्रमोद कुलकर्णी, दिलीप कुलकर्णी, उमेश नाईक, उत्तम रामदासी, वसंत रामदासी, सुधीर पुराणिक, वसंतराव अहंकारी,सुभाष वैद्य, सुरेश कुलकर्णी, अशोक भुमकर,ज्ञानेश्वर केसकर, गिरीश कुलकर्णी, सदानंद नाईक, प्रशांत जोशी, मुकुंद सांगवीकर,अजय देशपांडे, गोपाळकृष्ण देशपांडे, सौ. कुंदा रामदासी, वनमाला अहंकारी, सुनिता कुलकर्णी, प्राजक्ता रामदासी, सुप्रिया परळकर,संध्या भुमकर,अनिता कुलकर्णी, माया जोशी यांच्यासह १०० पेक्षा जास्त ब्राम्हण समाज बांधव सहभागी झाले होते .
उपोषण सुरू असताना नळदुर्ग शहर भाजप, भाजयुमो,शहर शिवसेना (उ.बा.ठा.),शहर मनसे व शहर पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी जाऊन ब्राम्हण समाज बांधवांच्या या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
सरकारने आमच्या सर्व मागण्या लवकर पुर्ण करून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा येणाऱ्या काळात ब्राम्हण समाज बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नळदुर्ग शहर सर्व शाखीय ब्राम्हण समाज संघटनेचे अध्यक्ष विनायक अहंकारी यांनी दिला आहे.
