नागरीकांना मोफत आधार लिंक व नविन आधारला मोबाइल लिंक कँम्प आयोजन
देशभक्त न्युज - ईटकूर प्रतिनीधी / -
केंद सरकार व राज्य सरकाच्या डिजीटल इंडिया मुळे नागरीकांना पुरती विकसीत तंत्रज्ञानाच्या माहितीचा अभाव असल्यामुळे अनेक अडी अडचणीला सामोरे जावे लागते या बाबीवर लक्ष केंद्रीत करुन ईटकूर येथील उच्चशिक्षित युवा तरुण अभिषेक गुजर यांनी येथे कर्ण फाऊंडेशनची स्थापना करून स्थानिक सह परिसरातील नागरीकांसाठी कर्ण मल्टीसर्व्हिसेस नावाने इंटरनेट ऑनलाईन सुविधेच्या माध्यमातुन दि . १० डिसेंबरपासुन आठवडी बाजार मैदान कार्यालयात कँम्प आयोजन करण्यात आले असुन आधारकार्ड लिंक व नविन आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असा कँम्प सुरु केला असल्यामुळे तालुका स्तरावर जाणे येणे दिवसभर वेळ वाया जाणे या नहाक त्रासाला येथे सुविधा उपलब्ध झाल्यामुळे सामोरे जाणे वाचणार आहे . सध्या कर्ण फाऊंशन सर्वांसाठी आधार ठरत आहे .
याबाबत सविस्तर बातमी अशी की , कळंब तालुक्यातील ईटकूर येथे प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतलेला तरुण परंतु नौकरी आणि कुटुंबात गुरफटत न राहाता आपण या मातीचे कांहीतरी देणे लागतो या उदात्त हेतुने स्वामी विवेकानंद आणि आईचे वडील आजोबा भागवत बप्पा तोडकरी यांच्या विचाराने प्रभावित होवून कर्ण फाऊंडेशनची स्थापना करुन त्या माध्यमातुन " जनसेवा ही ईश्वर सेवा मानून " व्यक्तिकेंद्रबिंदू मानून त्यांच्या सार्वजनिक , वैयक्तिक ,शासकीय स्तरावरील अडीअडचणी विविध उपक्रम राबवून सोडविणे यामुळे ईटकूर सह परिसरात सध्या कर्ण फाऊंडेशन अनेकांचा आधार ठरत आहे .

