Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कळंब नपने मालमत्ता करावरील व्याज माफ करून कराचा भरणा करून घ्यावा

 कळंब नपने मालमत्ता करावरील व्याज माफ करून कराचा भरणा करून घ्यावा

अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू उ.बा.ठा. सेनेने नप . प्रशासनास निवेदनाद्वारे दिला इशारा 



देशभक्त न्युज - कळंब  प्रतिनीधी / -

 सद्या बाजारपेठा थंड असून,  दुष्काळाचे  सावट आहे,मात्र नगरपरिषद ने मालमत्ता करावरील आकारलेले व्याज माफ करून करांचा भरणा करून घ्यावा,  नसता शिवसेना स्टाईल ने  आंदोलन करू असा इशारा उ.भा. ठा. सेनेने दिला आहे.

  नगरपरिषदे कडून मालमत्ता धारकाकडून विविध कर वसूल करण्यात येत आहेत . सद्या बाजारपेठा थंड आहेत, यातच दुष्काळाचे सावट आहे.  मालमत्ता कर भरणे  न झेपणारा  आहे .  अशा दुष्काळी परिस्थिती मध्ये नगरपरिषद जाणून बुजून या मालमत्ता करा वरील थकबाकीवर वार्षिक २४% तर मासिक २% व्याजाची आकारणी करून कराचा भरणा भरून घेत आहेत. सर्व सामान्य नागरिकांना व्यापाऱ्यांना व्याजासह थकबाकीचा भरणा करणे अशक्य आहे.तरी मालमत्ता करावरील आकरलेले व्याज माफ करून भरणा करून घ्यावा. तसेच

  शहरात बऱ्याच भागात पाण्याचा वेळेवर पुरवठा होत नाही, पाण्या साठी भटकंती ची पाळी येऊ लागली आहे, घंटा गाड्या फिरत नाहीत बऱ्याच भागात अंधाराचे साम्राज्य आहे, शहरातील मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद आहेत, मात्र मूलभूत प्रश्नाकडे नगरपरिषदे च्या प्रशासनाचे दुर्लक्ष असताना रजाकारी पद्धतीने कर्मचारी करांचा भरणा (व्याजासह) भरून घेऊ लागले आहेत. नगरपरिषद प्रशासनाने व्याज घेणे बंद करावे , नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, नसता आंदोलन करण्यात येईल व याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील ,असा इशारा ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा सभापती कृ. उ. बा.समिती  शिवाजी कापसे , मा .नगर सेवक सतीश टोणगे, ,श्याम नाना खबाले, अतुल कवडे, संजय होळे, यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.