काळेगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदी राहुल गदळे यांची निवड
गदळे व सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रमासह पालक
मेळाव्याचे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भव्य आयोजन
देशभक्त न्युज - केज प्रतिनीधी / -
सन १९८४ मध्ये सर्व स्तरातील मुला - मुलींना शिक्षण मिळावे या उदात्त हेतुने शिवकृपा विद्या प्रसारक मंडळ दहिफळ ( वड ) ची स्थापना संस्थापक / अध्यक्ष सखाहारी तात्या गदळे यांनी करुन काळेगाव (घाट ) येथे काळेगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक नावाने शाळा , महाविधालय सुरु करुन या संस्थेने बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात यशस्वी भरारी घेतली असुन आज येथील परिसरासह इतर जिल्ह्यातील विद्यार्थीही येथे मोठ्या संख्येने अनेक वर्षापासुन शिक्षण घेत आहेत . शाळेची , महाविद्यालयाची टोलेजंग इमारतही निसर्गरम्य वातावरणात बांधण्यात आली आहे .
शिवकृपा विद्या प्रसारक मंडळाचे सचिव तथा २००४ पासुन काळेगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक येथे ज्ञानदानाचे कार्य करणारे शिक्षक राहुल गदळे यांची प्राचार्य पदी निवड झाली असुन त्यांच्या या निवडी बद्दल व याच शाळेत ज्ञानदानाचे कार्य करणारे सेवानिवृत्त प्राचार्य आर . एस . मोराळे , सेवानिवृत्त शिक्षक बी . टी . गदळे यांच्या सत्काराचे आणि पालक मेळाव्याचे भव्य आयोजन महाविद्यालयामध्ये दि . १८ डिसेंबर सोमवार रोजी दुपारी १२ . ३० वाजता कख्यात आले आहे .
संपन्न होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जेष्ठ नेते नंदकिशोर काकाजी मुंदडा हे असणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवकृपा विद्या प्रसारक मंडळ दहिफळ (वड ) संस्थापक , अध्यक्ष सखाहरी तात्या गदळे , राहाणार आहेत या कार्यक्रमास कृउबास . उपसभापती डॉ . वासुदेव नेहरकर , कृउबास संचालक वसंतभाऊ केदार , काळेगाव सरपंच अविनाश गाताडे , मस्साजोग सरपंच अविनाश देशमुख , मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस , शिंदी उपसरपंच शिवाजी पाटील , केळगाव - बेलगाव सरपंच सुरेश कोठावळे , वडमाऊली विद्याप्रसारक मंडळ दहिफळ (वड . ) अध्यक्ष डॉ . शशिकांत दहिफळकर , सांगवी सरपंच संजय केदार , आरणगाव सरपंच सचिन सिरसट , आरणगाव - केळगाव - बेलगाव चेअरमन् आश्रुबा भांगे यांची प्रमुख उपस्थिती राहाणार असुन यावेळी पालक मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे
सदररील कार्यक्रमास मोठ्या संख्येनी वेळेवर उपस्थित राहण्याचे अवाहन प्राचार्य व सर्व कर्मचारी वृंद यांनी केले आहे .

