देशभक्त न्युज - कळंब प्रतिनीधी / -
प्रा .डॉ. अनिल जगताप यांनी पिएचडी प्राप्त केल्यामुळे त्यांचा या यशबद्दल सेवानिवृत्त शिक्षक तथा जेष्ठ कवी रमेश बोर्डेकर, सेवानिवृत्त शिक्षक शिलवंत बप्पा , सेवानिवृत्त भारत जाधव यांनी त्यांचा सन्मान करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या . जगताप यांचा जन्म बोर्ड या छोट्याशा खेड्यात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण याच गावातल्या जिप . प्राथमिक शाळेत झाले तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले वडील रावसाहेब जगताप अशिक्षित होते परंतु धडाडीचे कार्यकर्ते होते,आई सगजानही अशिक्षित परंतु आपल्या अपत्यांच्या पालन पोषणासाठी व शिक्षणासाठी आपलाही हातभार लागावा म्हणून त्यांनी छोटेशे किराणा दुकान चालवून मोठ्या ताकदीनं आणि जिद्दीने मुलांना उच्च शिक्षण दिले त्यांच्या दोन मुलांपैकी एक प्राध्यापक तर दुसरा मुलगा कळंब एसटी डेपो महामंडळात चालक म्हणून कार्यरत आहे. डॉ. अनिल जगताप हे सध्या छ. शिवाजी महाविद्यालय कळंब येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सचोटीने व अथक परिश्रम करुन "Indian Socio -political and cultural Realities in the Selected Novels of Tabish Khair " ह्या विषयावर प्रबंध व संशोधनात्मक अभ्यास करून डॉक्टरेट ही पदवी प्राप्त करून घेतली आहे .प्रा अनिल जगताप हे हरहुन्नरी कलावंत व प्राध्यापक म्हणून सर्वदूर ओळखले जातात . या त्यांच्या यशाबद्दल त्यांचा गौरव व सत्कार सर्वस्थरातुन होत असुन त्यांच्यावर अभिनंदणाचा वर्षाव होत आहे .
