Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पन्नास वर्षानंतर एकत्रित येत 1973 च्या एसएससी बॅचचा कौटुंबिक स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

 पन्नास वर्षानंतर एकत्रित येत 1973 च्या एसएससी बॅचचा कौटुंबिक स्नेह मेळावा उत्साहात संपन्न            





देशभक्त न्युज - कळंब प्रतिनिधी  / -

दुःख आडवायला मित्र उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा या कवी प्रा.अनंत राऊत यांच्या काव्यपंक्ती गुणगुणत कळंब दि. 30 नोव्हे. व 1डिसें. रोजी 1973 साली कळंब शहरात एस.एस.सी. झालेल्या मुला मुलींनी वयाची 65 वर्ष ओलांडल्या नंतरही एकत्र  येऊन एस.एस.सी.झाल्याचे  50 वर्षा नंतर एकत्र येऊन सुवर्ण महोत्सवी कौटुबीकस्नेह मिलन  सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला . या कार्यक्रमात शहरातील व बाहेर,महाराष्ट्रातील वेगवेगळे ठीकाणी,  परप्रांतात राहाणारी  25 विध्यार्थीनी व 40 विध्यार्थी  यांनी आपल्या सहचरणी सहचरणी समवेत भाग घेतला.   या कार्यक्रमास  प्रमुख अतिथी शहाजी सोळुंके  पोलीस महा निरीक्षक  (से.नि.)हे सं पत्नीक  हजर होते.  सारंगसर,टोणगे ,मोराळे या  सहस्त्र चंद्र पुर्ण केलेल्या व  जाधव, श्रीमती मिटकरी ताई , कुसुमताई जोशी या 75वर्ष पुर्ण केलेल्या गुरूजनांचा तसेच मथुरा बाई व  नरहरी कोठावळे या  वयाची अनुक्रमे 96व93वर्ष पुर्ण केलेल्या  1973 चे वर्ग मित्र प्रा. शिवाजी कोठावळे(से.नि) यांच्या आई वडीलांचा शाल, श्रीफळ,हार , विठ्ठल रुकमीणीची मुर्ती व गौरव पत्र देऊन मान्यवरांचे  हस्ते सत्कार वेद - मुर्ती  अनिल जोशी, अविनाश जोशी,सुभाष हरदास यांच्या मंत्रघोषात पाध्य  पुजन करुन करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या स्नेह मिलन सोहळ्या चे नियोजन इंजि. अशोक पोरे यांनी केले. या कार्यक्रमात  परिचय मेळावा,विवीध गुणदर्शन, भक्तीगीत , भाव गिते,नाट्यगायन, कथाकथन,भारूड,  पोवाडा, गोंधळ, जोगवा प्रामुख्याने विध्या .देशमुख,कल्पना भुमकर, वनिता भडंगे, अशोक पोरे यांनी सादर करुण कार्यक्रमास बहार आणली. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता प्रा. मनोरमा भवर, बसवराज राजमाने, आरूण जोशी,सुरेश कोकाटे, बाळासाहेब बोराडे,प्रा. सुरवसे,  मंगला सोनी, मारोती काळे, प्रा. केशव वरपे,गोविंद  देशमुख, गोविंद पौळ या 1973 च्या वर्ग  मित्रांनी विशेष परिश्रम घेतले. बैठक  व निवास व्यवस्था सभा मंडपात सह समीर देशमुख पांडे यांनी माफक दरात  केली. स्वादिष्ट भोजन श्रीओम मंगल सेवा चे मालक नरेश कुलकर्णी व दर्शन  पोरे यांनी अल्प दरात  दिले. तरुणांना लाजवेल असा बहारदार  सुवर्ण महोत्सवी कौटुबीकस्नेह मिलन सोहळा  वयाच्या 68 वर्षात विशेष परिश्रम धेऊन अशोक पोरे यांनी   50 वर्षा पुर्वी  शिक्षण घेत असलेल्या मित्रांना एकत्र करुनयशस्वी केल्या बद्दल त्यांचे  सर्वत्र  कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.