Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जागतिक दिव्यांग दिनाचा परंड्यातील प्रशासकीय कार्यालयांना पडला विसर.

जिल्हाधिकारी साहेब दिव्यांगाकडे आजच्या दिनी दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनातील जबाबदार अधिकार्‍यावर कारवाई करणार का ?



देशभक्त न्युज - परंडा प्रतिनीधी / - 

 दिनांक 3 डिसेंबर 2023 जागतिक दिव्यांग दिन हा संपूर्ण भारतभर तसेच महाराष्ट्रामध्ये उत्साहामध्ये साजरा होतो. परंतु धाराशिव जिल्ह्यामध्ये परंडा तालुक्यात दिव्यांग दिनाचा विसर पडल्याचे चित्र येथील प्रशासनातील कामचुकार जबाबदार बड्या बाबुंच्या दुर्लक्षाने दिसत आहे. यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.आम्हा दिव्यांगांना परंडा तालुक्यामध्ये मानसन्मान मिळत नाही हे आजच्या दिव्यांग दिना वरून लक्षात येते या दिनाचा सखोल विचार करावा अशी मागणी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने जिल्हाधिकारी  धाराशिव यांना करण्यात येत आहे. प्रशासन स्तरावरुन सध्या  महाराष्ट्रा मध्ये आजादी का अमृत महोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात पेतोय  परंतु  दिव्यांगाचा हा सण धाराशिव जिल्ह्यामध्ये का साजरा होत नाही ही दि व्यांगाची मोठी हेवसांड आहे जेथे दिव्यांगांचा सन्मान तोचि असे आम्हा अभिमान दिव्यांगांना न्याय मिळावा व दिव्यांगाना योग्य योजनांची माहिती मिळावी यासाठी दिव्यांग बांधव  वारंवार झगडत आहेत तरी देखील सध्या दिव्यांगाचे शासन असताना देखील दिव्यांगांचा हा सण परंडा तहसील कार्यालय,पंचायत समिती  अशा शासकीय ठिकाणी हा दिव्यांग दिन साजरा केला जात नाही याचे कारण येथील दिव्यांग बांधवांना समजावे व  दिव्यांगाना न्याय मिळावा अशी मागणी परंडा तालुका दिव्यांग बांधव करत आहोत 

 जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी  दिव्यांगाकडे दिव्यांग दिनी दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनातील जबाबदार अधिकार्‍यावर कारवाई करणार का ? घडलेल्या या गंभीर प्रश्नी लक्ष घालून  दिव्यांगाचा दिव्यांग दिन साजरा करण्यास तालुका स्तरावरील अधिकार्यांना आदेश  देवून कार्यक्रम साजरा करण्यास प्रवृत्त करुन दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा अशी दिव्यांगातुन मागणी होत आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.