३ जानेवारी रोजी ईटकूर येथे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन
देशभक्त न्युज - ईटकूर प्रतिनीधी / -
कळंब तालुक्यातील ईटकूर येथे बुधवार दि. ३ जानेवारी रोजी येथील महादेव मंदिरात एच. व्ही . देसाई रुग्णालय मंमदवाडी हडपसर पुणे आणि ईटकूर ग्राम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने डोळे तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन गावातील नागरिकांनी व परिसरातील डोळ्यांच्या विविध समस्या असलेल्या रुग्णानी याचा लाभ घेण्याचे अवाहन आयोजका कडुन करण्यात येत आहे . संपन्न होणाऱ्या सदरच्या शिबिरामध्ये मोतीबिंदू ऑपरेशन पूर्णपणे मोफत केले जाणार असुन ज्यांना नंबरचे चष्मे लागतील त्यांना अल्पदरा मध्ये चष्मे देण्यात येणार आहेत . सतत डोके दुखणे , डोळ्यातून पाणी येणे , डोळे लाल होणे व जवळच आणि लांबच कमी दिसणे याच्यावर या शिबीरात तज्ञ डॉक्टरांकडुन तपासणी केली जाणार आहे . तरी सर्वांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे अवाहन एच. व्ही . देसाई रुग्णालय मंमदवाडी हडपसर पुणे आणि ईटकूर ग्राम पंचायत यांच्या वतीने करण्यात आले आहे व सदरच्या शिबिरामध्ये नाव नोंदणी फीस 20 रुपये आकारली जाईल याबाबत ही जनजागृती करण्यात येत आहे .
