धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी अभिषेक गुजर यांची निवड
निवडी बद्दल कळंब येथे तालुका काँग्रेस च्या वतीने शिवाजी चौकात सत्कार
देशभक्त न्युज - कळंब प्रतिनिधी / -
अभिषेक गुजर यांची धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी व अनंतराव घोगरे यांची चिटणीस पदी निवड झाल्याबद्दल कळंब तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे .ही निवड नळदुर्ग येथे माजी आमदार मधुकरराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील ,राजाभाऊ शेरखाने यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून जाहीर करण्यात आली.
या निवडी बद्दल कळंब तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि २० रोजी कळंब तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष पांडुरंग कुंभार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अल्पसंख्यांक सेलचे कळंब तालुकाध्यक्ष शहाजान शिकलगार, कळंब शहर कार्याध्यक्ष सचिन गायकवाड, विश्वास हौसालमल ,रोहन कुंभार ,धनंजय लांडगे ,विक्रम पाटील, राहुल अडसूळ,प्रकाश फरताडे, जयदीप जाधव ,चैतन्य मनगिरे, विश्वजीत मोटे, मकसुद शिकलगार, दत्ता रणदिवे, ऋषी जगताप, राहुल जगताप, शिवाजी बाराते , शुभम काळे ,समाधान भराडे,ओमकार बोबडे, कुणाल कांबळे,केतन कांबळे, समाधान कांबळे, आमर झेंडे,बालाजी अडसूळ,बालाजी पाटील, धनाजी पाटील, गोविंद आडसुळ ,अरबाज सय्यद, आदर्श माने,वसीम तांबोळी,दीपक सुतार ,सलमान शेख कार्यकर्ते उपस्थित होते.
