बावी येथे वंचित बहुजन आघाडी शाखेच्या नामफलकाचा अनावरण सोहळा प्रवीण बागुल यांच्या हस्ते संपन्न
शाखा पदाधिकारी समाज बांधवात नवचैतन्य
देशभक्त न्युज - वाशी - अनिल धावारे
वाशी तालुक्यातील बावी येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाची शाखा स्थापना नामफलकाचा अनावरण सोहळा नुकताच सर्व समाज बांधवां च्या उपस्थितीत व मराठवाडा अध्यक्ष प्रवीण (दादा) रण बागुल , धाराशिव जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण शिंदे . वाशी ता अध्यक्ष संतोष सरवदे. ता महासचिव दत्ता शिंदे .तसेच इतर कार्यकर्ते तसेच नेते मंडळींच्या उपस्थितीत दि.१७ रोजी सायंकाळी बावी येथे अशोक सम्राट चौक येथे प्रवीण बागुल यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडी शाखा नामफलकाचा रिबिन कापून अनावरण सोहळा संपन्न करण्यात आला यावेळी बावी वंचित बहुजन आघाडी शाखेचे अध्यक्ष दयानंद धावारे. उपाध्यक्ष दिशांत धावारे. शा सचिव रोहित करवे. विजय जगताप. शाखा सचिव जीवा कांबळे. इंद्रजीत धावारे .शाखा कोषाअध्यक्ष प्रशांत धावारे. संदेश धावारे. शाखा संघटक रवण धावारे. हनुमंत धावारे. शाखा मार्गदर्शक राहुल धावारे .नानासाहेबधावारे. यावेळी इतर कार्यकारणी शाखा सदस्य आनंद गरड . सुरज निकाळजे. आनंद पारवे. महादेव पाटोळे. अशोक कानडे. आदी पदाधिकाऱ्या सह गावातील लहानथोर ,जेष्ठ मंडळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
