आदिवासी पारधी समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील
गौरीप्रसाद हिरेमठ - उपविभागिय पोलिस अधिकारी कळंब
देशभक्त न्युज - ईटकूर प्रतिनीधी / -
कळंब तालुक्यातील ईटकूर , कोठाळवाडी , वाकडी अंतर्गत येणाऱ्या आदिवासी पारधी बांधवांच्या आधार कार्ड , शिधापत्रिका , जातीचे प्रमाणपत्र , आदिवासी प्रकल्प विभाग सोलापूर विभागा अंतर्गत पारधी समाज बांधवाना दिल्या जाणाऱ्या विविध योजना , पंचायत समिती स्तरावरून दिल्या जाणाऱ्या विविध योजना आदि सखोल माहिती याबबत महादेव मंदिर टोकणी येथे जिल्हाधिकारी डॉ .सचिन ओम्बासे , पोलिस अधिक्षक अतुल कुलवर्णी यांच्या संकल्पना आदेशानुसार आणि उपविभागिय पोलिस अधिकारी उपविभाग कळंब चे गौरीप्रसाद हिरेमेठ यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेश साबळे , सहाय्यक पोलिस निरीक्षक कांबळे यांनी आपल्या पोलिस कर्मचारी वर्ग आणि तहसिल अधिकारी , कर्मचारी , पंचायत समिती अधिकारी , कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते .
यावेळी उपस्थित आदिवासी पारधी बांधवांना मार्गदर्शन करताना कळंब उपविभागिय कार्यालयाचे उपविभागिय पोलिस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ असे म्हणाले की , धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ . सचिन ओंम्बासे , धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक अतुल कलकुर्णी यांचे आपल्या समाजाकडे विशेष लक्षकेंद्रीत असुन आदिवासी पारधी समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी जिल्हा प्रशासन स्तरावरून त्यांचे सर्वतोपरी मोठे प्रयत्न सुरु आहेत .
यावेळी व्यासपिठावर आदिवासी प्रकल्प विभाग सोलापूर चे सरतापे , माजी तहासिलदार शिंदे , मानवीहक्क अभियानचे कॉ . बजरंग ताटे , कळंब नपचे . माजी नगरसेवक सुभाष पवार , ईटकूर ग्रापचे सरपंच म्हणून व्यासपिठावर उपस्थित सरपंच पती तथा ,ग्राप . सदस्य हनुमंत कसपटे यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी पोलिस निरीक्षक सुरेश साबळे यांनी आपणास कागपत्रा संबंधी अडी अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे अवाहन केले व सर्वांनी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून प्रत्येक कुटुंबाने प्रशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून आपले जिवन सुजलाम सुफलाम करण्याची भावनीक साद घातली .
आदिवासी प्रकल्प विभाग सोलापूरचे सरतापे यांनी आपल्या विभागामार्फत पारधी समाज बांधवांना दिल्या जाणाऱ्या सार्वजनिक योजना यामध्ये घर ,रस्ते , विज , पाणी , शिक्षण , उपजिवेकसाठी वैयक्तिक योजना याबबत अर्ज कसा करावा , कागदपत्रांची सविस्तर सर्वाना समजेल अशी त्यांचेच भाषेत माहिती दिली .
मानवीहक्क अभियानचे बजरंग ताटे यांनीही आपले विचार मांडले .
या कार्यक्रमास आदिवासी पारधी समाज बांधवांच्या महिला , पुरुष , तरुण मंडळींची मोठी गर्दी होती तर ईटकूर येथील प्रदिप फरताडे , इंजि . अभिजीत गंभीरे , इंजि . सैन्यपाल लंगडे , ग्राप . सदस्य विनोद चव्हाण , तुकाराम शिंदे आदिंची मोठी उपस्थिती होती . कार्यक्रम यशस्वितेसाठी पोहेकाँ . बाळासाहेब तांबडे , गणेश वाघमोडे , मायंदे आदि पोलिस कर्मचारी यांनी मोठे परिश्रम घेतले .
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन देशभक्तचे संपादक लक्ष्मण शिंदे यांनी केले .

