नळदुर्गच्या ऐतिहासिक नगरीत श्री . खंडोबा व बाणाईचा शुभ विवाह झाला त्याच नळदुर्गच्या पवित्र भूमीत दि . १७ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र रामतीर्थ येथे हजारो रामभक्तांच्या उपस्थिती व रामतीर्थचे महंत श्री . विष्णु प्रसाद शर्मा महाराज यांच्या प्रयानातुनश्री राम व सिता मातेचा शुभ विवाह संपन्न झाला .
देशभक्त न्युज - नळदुर्ग - ( सुहास येडगे )
ऐतिहासिक नळदुर्गच्या ज्या नगरीत श्री खंडोबा व बाणाईचा शुभ विवाह झाला त्याच नळदुर्गच्या पवित्र भुमीत दि.१७ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र रामतीर्थ येथे हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत व श्री क्षेत्र रामतीर्थचे महंत श्री विष्णु प्रसाद शर्मा महाराज यांच्या प्रयत्नातुन श्री राम व सिता मातेचा शुभ विवाह संपन्न झाला त्यामुळे पुन्हा एकदा नळदुर्गची भुमी धन्य झाली.
नळदुर्गची भुमी पवित्र व पावन आहे. प्राचिन काळी याच ऐतिहासिक नळदुर्गच्या भुमीत श्री खंडोबा व बाणाईचा शुभ विवाह झाला होता त्यावेळी स्वर्गातील संपुर्ण देव श्री खंडोबा व बाणाईच्या विवाहासाठी नळदुर्गच्या भुमीवर अवतरले होते.त्याचीच पुनरावृत्ती दि.१७ डिसेंबर रोजी झाली आहे. श्री क्षेत्र रामतीर्थ येथे दि. १७ डिसेंबर रोजी श्री प्रभु रामचंद्र व सिता मातेचा शुभ विवाह संपन्न झाला. यावेळी वेदशास्त्रसंपन्न तिरुपती येथील ब्रम्हवृदांच्या मंत्रोच्चारात व हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत भव्य दिव्य असा हा शुभ विवाह संपन्न झाला. हा पावन योग फक्त श्री क्षेत्र रामतीर्थचे महंत श्री विष्णु प्रसाद शर्मा महाराज यांच्या प्रयत्नातुन झाला आहे.
सकाळी ७.३० ते ९.३० यावेळेत अलंकार व पुजा करण्यात आली. यानंतर श्री प्रभु रामचंद्र व सितामातेच्या मुर्तींची फुलांनी सजविलेल्या भव्य मंडपात प्रतिष्ठापणा करण्यात आली. यानंतर विविध धार्मिक विधी पार पडल्यानंतर श्री प्रभु रामचंद्र व सितामतेचा विवाह संपन्न झाला. यावेळी श्री प्रभु रामचंद्र व सितामातेला विविध अलंकार घालण्यात आले त्यानंतर अक्षता टाकण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी विविध देवदेवतांच्या ११ आरत्या करण्यात आल्या. यानंतर उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
दि.१६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वा. श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे श्री राम व सिता मातेच्या मुर्तींची पालखीतुन वाजत गाजत व टाळ मृदंगाच्या गजरात भव्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी महंत श्री विष्णु प्रसाद शर्मा महाराज यांच्यासह शेकडो रामभक्त श्री रामाचा जयजयकार करीत नाचत होते. यावेळी आकर्षक अशी शोभेची दारू उडविण्यात आली.
नळदुर्गच्या इतिहासात प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र रामतीर्थ येथे श्री राम व सितमाता यांचा शुभ विवाह संपन्न झाला आहे. हा विवाह सोहळा यशस्वी होण्यासाठी महंत श्री विष्णु प्रसाद शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रामभक्तांनी परीश्रम घेतले.


