भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ . भीमराव यशवंतराव आंबेडकर यांची उमरगा येथे धावती भेट
वंचित बहुजन आघाडी , भारतीय बौद्ध महासभा , समता सैनिक दल उमरगा यांच्या वतीने करण्यात आला सत्कार
देशभक्त न्युज - उमरगा प्रतिनिधी / -
उमरगा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भारती बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांचा वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल उमरगा यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते रामभाऊ गायकवाड व भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष संतोष सुरवसे राजेंद्र सूर्यवंशी प्रा.संजय कांबळे अविनाश भालेराव प्रा. सूर्यकांत वाघमारे श्रीधर सरपे विक्रांत सूर्यवंशी उमाजी गायकवाड गुणवंत गायकवाड विजय झाकडे जीवन सूर्यवंशी मादळे नायचाकूर जवळगाबेटच्या माजी सरपंच उषाताई रामभाऊ गायकवाड प्रांजल गायकवाड संविधान गायकवाड सोपान सूर्यवंशी सह तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन प्राध्यापक संजय कांबळे सर यांनी केले तर रामभाऊ गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.
