देशभक्त न्युज - कळंब / -
पूर्वी तक्रार केली तेंव्हा नपने घाणीचा कचरा उचलला होता परंतु आणखीन पुन्हा पूर्वीपेक्षा जास्त घाण याठिकाणी टाकण्यात आली आहे .ऑफीस वेळेत अशी घाण टाकणारे घाण टाकत नाहीत ....
प्रकल्प अधिकारी वैशाली सांगळे यांची माहिती ....
या गंभीर प्रश्नी नपच्या मुख्यअधिकारी शैला डाके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ स्वच्छता करुन पुढील काळात घाण करणाऱ्यांना आळा घालण्यात येईल अशी प्रतिक्रीया दिली ....
मुख्य प्रवेशद्वाराच्या वाटेवरच घाणीच्या ढिगार्याचे व तळीरामांच्या दारू बाटल्यांचे दर्शन ....
बालवयात बाराखडी व अक्षरांची ओळख करून त्यांना सुसंस्कार , आरोग्याचे धडे देऊन देशाची आदर्श युवा पिढी घडविणाकामी मुख्य कामगिरी बजावणाऱ्या तालुका कार्यालयाचा कारभार कळंब नप . च्या दुर्लक्षामुळे चालतोय घाणीच्या साम्राज्यात ....
आज देशाची युवा पिढी घडविण्या कामी ज्या बालमनावर बाराखडी अक्षरांची ओळख आणि त्यामाध्यमातुन त्यांच्यावर आईवडिला नंतर अंगणवाडी च्या माध्यमातुन सर्वत्र अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतणीस ताई यांच्याकडुन सुसंस्कार , चांगल्या वाईट गोष्टींची जाणिव करून देवून त्या बालकांना चांगले जिवन आरोग्य जागण्याचे धडे दिले जातात त्यांचेच मुख्य ऑफिस म्हणजे तालुकास्तरावरील एकात्मिक बलविकास योजना आफीस सध्या घाणिच्या साम्राज्यात कारभार चालवतेय तरी अशा गंभीर प्रश्नी नप. सह वरिष्ठ प्रशासन विभागचे दुर्लक्ष का ? असा प्रश्न निर्माण झाल्यामुळेच या विषयाची रोख - ठोक चर्चा तर होणारच ..... !
एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प कळंब यांच्या शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागाच्या कार्यक्षेत्रातील कामाची व्याप्ती पाहिली तर एकूण अंगणवाडी २५१ त्यापैकी मिनी ३२ व मोठ्या अंगणवाडी २१९ ,कार्यकर्ती २१९ , मदतनीस २१९ ,मिनी कार्यकर्ती ३२, ३ ते ६ वर्षांची बालके, गरोदर, स्तनदा माता ,किशोरी मुली ज्यांच्या नियमित कार्यालयात वैयक्तिक लक्ष देवून राबता असतो अशी तालुक्याची सुमारे लाभार्थी संख्या १७ ते १८००० हजार अशी असुन या विभागाच्या माध्यमातुन शिलाई मशिन, पिठगिरणी, सायकल,संगणक अश्या विविध योजनासह ,बालसंगोपन ,माझी कन्या भाग्यश्री योजना यांचे लाभार्थी यांची या कार्यालयात मोठी सदैव वर्दळ असुन अंगणवाडी बांधकाम व दुरुस्ती प्रस्ताव घेऊन येणारी मंडळी या अशा एक ना अनेक व्यक्ती सर्वांना या कचरा , दुर्गंधी आणि तळीराम दारुडे यांनी दारू ढोसुन रस्त्यावर टाकलेल्या बाटल्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो .
अशा या प्रकारावर नगरपरिषद , विभागाचे तालुका स्तरावरील प्रशासनाचे वरिष्ठ विभाग , पोलीस प्रशासन आळा घालणार का ? हा सध्यातरी एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाच्या समोर मोठा प्रश्न पडला आहे .




