Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कळंब येथे श्रमिक मानवाधिकार संघाच्या वतीने १०० चेतक कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न




 देशभक्त न्युज - कळंब प्रतिनीधी / -

कळंब येथे दि. ११ डिसेंबर रोजी ॲक्शन एड व श्रमिक मानवाधिकार संघाच्या वतीने शहरातील मुंडे शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये १०० चेतक कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन दै.लोकमत चे पत्रकार बालाजी अडसूळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या वेळी लहुजी शक्ती सेनेचे बालाजी गायकवाड, धाराशिव योद्धा चे पत्रकार हनुमंत पाटुळे,कळंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे, जिल्हा अतिरिक्त न्यायालयाचे ॲडव्होकेट एस, आर,आगलावे, मानविहक्क अभियान च्या जिल्हाध्यक्षा माया शिंदे यांनी या १०० चेतक  कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शना मध्ये पोलीस, निवासी अतिक्रमण, वन गायरान, अतिक्रमण, ॲट्रॉसिटी ॲक्ट, महिला के साथ हिंसा के खिलाफ, हवामान बदल व त्याचा परिणाम, शासकीय योजना, आदी विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी या मार्गदर्शनासाठी कळंब तालुक्यातील मस्सा (खं),शिराढोण,नायगाव,मोहा, येरमाळा,पानगाव,मंगरूळ, अडसूळवाडी,रांजणी, शिराढोण,गौरगाव,वडगाव (सि),बाभळगाव,जवळा, सोनेगाव,विझोरा,कन्हेरी,या ठिकाणचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सदरील कार्यक्रम दि. 18 डिसेंबर रोजी ही होणार असून या कार्यक्रमास राष्ट्रीय जमीन अधिकार आंदोलन चे विश्वनाथ तोडकर,व स्वराज इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष ललीत बाबर हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन श्रमिक मानवाधिकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे यांनी केले होते. या वेळी अमर ताटे, वैभव ताटे, प्रथमेश गायकवाड, अशोक गायकवाड,नवनाथ भंडारे, मधुकर गालफाडे, सुनिल गायकवाड, विनोद कांबळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.