
मानवहित लोकशाही पक्षाने दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन
देशभक्त न्युज - खामसवाडी प्रतिनिधी / -
मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयास विविध मागण्यांचे निवेदन दि. ८ डिसेबर २०२३ रोजी देण्यात आले. या वेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर 'भारतरत्न पुरस्कार' देण्यात यावा, मांग समाजाला लोकसंख्येचे प्रमाणात स्वतंत्र 'अ,ब,क,ड'आरक्षण देण्यात यावे,कळंब तहसील कार्यालय मधून नवीन शिधापत्रिका धारकांना शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात याव्यात, कळंब तालुक्यातील मांग समाजाला स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यात यावी,ज्या ठिकाणी मांग समाजाची स्मशानभूमी ७/१२ पत्रकावर उपलब्ध आहे, त्या स्मशानभूमीची मोजणी करून समाजाच्या ताब्यात देण्यात यावी, कळंब शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या चौकाचे सुशोभिकरण करण्यात यावे, कळंब तालुक्यातील भूमिहीन वंचित रेशन कार्ड लाभधारकांना तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करावे, तसेच कळंब तहसील कार्यालयाकडून गेल्या दोन वर्षापासून राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेचे वाटप झालेले नाही, ते तात्काळ वाटप करण्यात यावे.आदि मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत. सदरील मागण्या मान्य न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला आहे. या निवेदनावर मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे, युवक जिल्हाध्यक्ष किरण भाऊ कांबळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रघुनाथ भाऊ पाटुळे, कळंब तालुकाध्यक्ष धनंजय ताटे, तालुका संघटक दत्ता झोंबाडे,जिल्हा संघटक अंकुश झोंबाडे यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.