Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कृषिप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशातील शेतकरी सुजलाम् सुफलाम् पहायचा असेल तर पाच एक्कर पर्यंत पेरणी ते कापणी रोहयोच्या माध्यमातुन व्हावी

कृषिप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशातील शेतकरी सुजलाम् सुफलाम् पहायचा असेल तर पाच एक्कर पर्यंत पेरणी ते कापणी रोहयोच्या माध्यमातुन व्हावी

 महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पर्याय संस्थेचे प्रमुख - विश्वनाथ तोडकर




कळंब । प्रतिनीधी 

शेती, शेतमजूर व ग्रामीण अर्थकारण याविषयावर चर्चा करताना महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष व पर्यायचे संस्थेचे प्रमुख विश्वनाथ तोडकर यांनी कृषिप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशातील शेतकरी सुजलाम् सुफलाम् पहायचा असेल तर महाराष्ट्र सरकारने  पाच एक्कर पर्यंत पेरणी ते कापणी रोहयोच्या माध्यमातुन करण्यासाठी प्रधान्य देणे गरजेचे आहे म्हणून यासाठी किमान पाच एकरच्या आतमध्ये क्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांची 'पेरणी ते कापणी ' ही कामे रोजगार हमी योजनेतून करावीत अशी आमची आग्रही मागणी राहिल . या योजनेसाठी कोट्यावधीचा निधी आहे. तो अखर्चीत म्हणून परत जात आहे. शेतीची ही कामे यात समाविष्ट केली तर ग्रामीण अर्थकारण स्थिरस्थावर होईल असेही तोडकर यांनी सांगितले

हसेगाव ( के .) ता. कळंब येथील पर्याय संस्थेच्या परिसरातील सभागृहात  महाराष्ट्र लोकविकास मंच व पर्याय सामाजीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसेवी संस्था क्षेत्रात कार्यरत असणारे ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते व विविध दै . सा . वृत्तपत्र , सोशिएल मिडीया  संपादक , पत्रकार बांधव  यांच्यातील 'संवाद' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी मार्गदर्शन करताना तोडकर बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र लोकविकास मंच चे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ  तोडकर, सचिव भूमिपुत्र वाघ, संघटक रमाकांत कुलकर्णी, राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हस्कु नाथु कोंढाळकर , कोषाध्यक्ष मनीषा घुले, एकल महिला संघटक सुनंदा खराटे, अनिताताई तोडकर, विद्याताई वाघ , देशभक्त चे संपादक लक्ष्मण शिंदे ,  पत्रकार सतीश टोणगे ,अशोक शिंदे , बालाजी आडसुळ  , विलास मुळीक , संदीप कोकाटे , संपादक पांडुरंग मते , संपादक दत्ता गायके , संपादक प्रा . मातने पत्रकार अशोक शिंदे , संभाजी गिड्डे, जयनारायण दरक , माधवसिंग राजपुत , शितल धोंगडे , मंगेश यादव , प्रताप यादव , फाटक , माळी , दिपक बारकुल , अमर चोंदे ,परमेश्वर पालकर आदी उपस्थित होते.

यावेळी सर्वांशी संवाद साधताना राज्यातील महिलांचे प्रश्न , शिक्षण व आरोग्य , रोजगार व वाढती व्यसनाधीनता , ग्रामीण अर्थकारण  आदी विषयावर चर्चासत्र झाले. वर्तमानात व भविष्यात कोणते प्रश्न दखलपात्र आहेत व त्याच्यावर उपाय ठरणारी उत्तरे काय आहेत ? यावर मंथन झाले . प्रास्ताविक संयोजक विश्वनाथ तोडकर यांनी केले तर आभार भूमिपुत्र वाघ यांनी मानले . यशस्वितेसाठी पर्यायचे विलास गोडगे, भिकाजी जाधव , विकास कुदळे , बालाजी शेंडगे आदींनी परिश्रम घेतले .

▪️ समोर वेडवाकडं घडत असेल आणि समस्या निर्माण होत असेल तर त्याची मनात चीड आली पाहिजे . त्यातून व्यवस्था बदलण्या साठी प्रयत्न व्हायला हवेत . आजकाल मात्र संवेदना बोथट झाल्यांच दिसतेय . ते काय ? सरकारचं काम म्हणून कसे चालेल . हे एकट्याचं पण काम नाही . त्यामुळे समाजातील उणीवा , या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी संघटीत होवून प्रयत्न केले पाहिजेत असे मत महाराष्ट्र लोकविकास मंचचे पुणे येथील राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हस्कू नाथु कोंढाळकर यांनी व्यक्त केले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.