माकणी करजगाव या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे - पाटील यांच्या सभेची जोरदार तयारी .
देशभक्त न्युज - उमरगा प्रतिनिधी / -
लोहारा तालुक्यातील माकणी, करजगाव येथे 11 डिसेंबर रोजी मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होत असून, यासाठी स्टेज उभारणीसह अन्य कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत.
जरांगे यांच्यावर शंभर जेसीबींद्वारे होणार फुलांची उधळण सकल मराठा बांधवांकडून लोहाराऱ्यातील जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू वाहन पार्किंगची इथे व्यवस्था उघड्या कारमधून काढणार रॅली
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची सोमवारी माकणी करजगाव येथील मैदानात जाहीर सभा होत आहे. तालुक्यातील मराठा सकल समाजबांधवांनी या सभेची जय्यत तयारी केली असून, या दिवशी जरांगे - पाटील यांच्यावर शंभर जेसीबीद्वारे फुलांची उधळण करून स्वागत केले जाणार असल्याचे आजच्या बैठकीत सांगण्यात आले आहे .मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर दौरे करीत असून, लोहारा येथेही त्यांची सोमवारी जाहीर सभा होत आहे..
■ सभेसाठी मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव येणार असल्याने वाहानांची गर्दीही मोठ्या संखयेने होणार
■ यासाठी माकणीतील सिद्धेश्वर मंदिर, लोहारा रस्ता, भारत विद्यालय करजगाव गावात व इतर ठिकाणी वाहन पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मैदान परिसरात तात्पुरत्या शौचालयांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. माकणी करंजगाव भव्य मैदानावर ३० बाय ३० आकाराचे स्टेज तसेच १०० फुटाचे रॅम्प तयार करण्यात येत आहे. महिला व पुरुषांच्या बसण्याची स्वतंत्र व्यवस्था
■ मनोज जरांगे-पाटील यांचे माकणी परिसरात आगमन झाल्यानंतर त्यांची उघड्या कारमधून सभास्थळापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. यावेळी १०० जेसीबींमधून फुलांची उधळण करण्यात येणार आहे.
चहा , पाणी अन् नाश्त्याचीही ठिकठिकाणी होणार सोय .
या सभेसाठी येणाऱ्या बांधवांकरिता मुस्लीम बांधवांकडून जागोजागी पाण्याची सोय करण्यात येणार आहे. याशिवाय सभेला येणाऱ्या नागरिकांना नाश्त्याची सोय करण्यात येणार आहे."
असून, सभेला एक लाख मराठा समाज बांधव उपस्थित राहतील, असा अंदाज असून, त्यानुसार नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
शहरात व मैदाना परिसरात विविध पथके तैनात
जागोजागी कोअर कमिटीच्या वतीने बॅनर्स लावण्यात येणार आहेत. गर्दीवर शिस्तपालन करण्यासाठी एक हजार स्वयंसेवक नेमण्यात येणार असून, वैद्यकीय पथक तैनात राहणार आहे.
