Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अप्पर पोलिस महासंचालक श्रीकृष्ण प्रकाश यांच्याकडुन ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याची पहाणी .

 अप्पर पोलिस महासंचालक श्रीकृष्ण प्रकाश यांच्याकडुन ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याची पहाणी



देशभक्त न्युज - नळदुर्ग  प्रतिनिधी / -

 अप्पर पोलिस महासंचालक श्रीकृष्ण प्रकाश यांनी दि.८ डिसेंबर रोजी नळदुर्ग पोलिस ठाण्याला भेट देऊन पोलिस ठाण्याच्या कामकाजाची पाहणी केली यावेळी त्यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. पोलिस ठाणे पाहणीनंतर अप्पर पोलिस महासंचालक  श्रीकृष्ण प्रकाश यांनी नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यास भेट देऊन किल्ल्याची पाहणी केली. यावेळी युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

       अप्पर पोलिस महासंचालक  श्रीकृष्ण प्रकाश हे धाराशिव जिल्हा पोलिस दलाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. दि.८ डिसेंबर रोजी अप्पर पोलिस महासंचालक  श्रीकृष्ण प्रकाश हे नळदुर्ग पोलिस ठाण्याला भेट देऊन पोलिस ठाण्याच्या कामकाजाची पाहणी केली. अप्पर पोलिस महासंचालक  श्रीकृष्ण प्रकाश यांचे नळदुर्ग शहरात आगमन झाल्यानंतर नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले. श्रीकृष्ण प्रकाश यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या कामकाजाची पाहणी केल्यानंतर नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

       पोलिस ठाण्याच्या पाहणीनंतर अप्पर पोलिस महासंचालक  श्रीकृष्ण प्रकाश यांनी नळदुर्गच्या प्राचिन व ऐतिहासिक किल्ल्यास भेट देऊन किल्ल्यातील विविध स्थळांची पाहणी केली. किल्ल्यात आगमन होताच अप्पर पोलिस महासंचालक  श्रीकृष्ण प्रकाश यांचे युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या वतीने नळदुर्गचे माजी नगराध्यक्ष शहेबाज काझी यांनी सत्कार करून त्यांचे स्वागत केले यावेळी किल्ल्यातील युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे व्यवस्थापक जुबेर काझी, जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते

   अप्पर पोलिस महासंचालक  श्रीकृष्ण प्रकाश यांनी किल्ल्यातील बारादरी,उपली बुरुज, पाणीमहाल यासह इतर प्रेक्षणीय स्थळांची व त्याठिकाणी असणाऱ्या तोफांची पाहणी केली. उपल्या बुरुजाच्या पायऱ्या चढुन बुरुजावर जाऊन त्यांनी किल्ला परीसराची पाहणी केली. त्याचबरोबर किल्ल्यातील बोरी नदीत सुरू असलेल्या बोटिंगची सफर करून त्यांनी बोटिंगचाही मनमुराद आनंद लुटला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक गौहर हसन, तुळजापुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे, उमरग्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रमेश बरकते, उमरग्याचे पोलिस निरीक्षक पारेकर लोहारे, घनशाम चिंतले, मुरूमचे मचिंद्र शेंडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, पोलिस उपनिरीक्षक शौकत इनामदार आदीजन उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.