आदित्य शिक्षण संस्था ,बीड ने संकुलामध्ये 2100 दिवे लावून रामरक्षा स्रोत व हनुमान चालीसा पठण कार्यक्रम केला संपन्न
देशभक्त न्युज बीड प्रतिनिधी
श्रीरामलला मंदिर आयोध्या येथे होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 22 जाने रोजी आदित्य शिक्षण संस्थेने आयोध्येतील क्षणाचा आपणही एक भाग आहोत आणि या आनंदात सहभागी होण्यासाठी सदर कार्यक्रमाचे भव्य आयोजन केले होते .
आदित्य शिक्षण संस्थे मधील सर्व महाविद्यालय चे प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थिततीत गणपती मंदिर येथे सकाळी *राम रक्षा स्तोत्र व पाच वेळा हनुमान चालीसा पठण* करण्यात आले .
" लख्ख दिव्यांचा मनमोहक दियोत्सव "
तसेच सायंकाळी संकुल प्रांगना मधे 2100 दिवे लावून जल्लोषात दिपोत्सव साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रम हा डॉ . आदितीताई सारडा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला .
कार्यक्रमासाठी डॉ. आदिती सारडा मॅडम , प्रा. तांबे सर, प्रा.मुंढे सर, प्रा. भुतडा सर, प्रा. कचरे सर, प्रा. हिंगणे सर, प्रा. सानप सर, प्रा. गर्जे सर, प्रा. हिमांशू सर, प्रा. बहिरवाल सर, प्रा.शिंदे मॅडम, प्रा. सत्कर सर, डॉ. मोरे सर व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी* मोठ्या संख्येने उपस्थित होते.

