पानगावच्या सरपंचपदी मनिषा ओव्हाळ तर उपसरपंचपदी
शिवाजी बेडके यांची बिनविरोध निवड
देशभक्त न्युज - येरमाळा प्रतिनिधी / -
कळंब तालुक्यातील पानगाव ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच माणिक विठ्ठल ओव्हाळ आणि उपसरपंच शिवाजी बेडके यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कळंब यांच्याकडे आपला राजीनामा दिल्यामुळे येथील दोन्ही पदे रिक्त झाल्यामुळे या पानगाव ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक घेण्या बाबातचे कळंबचे तहासिलदार यांच्या आदेशान्वये पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर . व्ही . चकोर यांनी ग्रामसेवक यांना दि . २ जानेवारी रोजी निवडणूक अधिकारी एन. के . मंडाळे मंडळ अधिकारी मस्सा ( खं ) यांच्या उपस्थितीत सरपंच पदाची निवडणूक घेण्याचे पत्राद्वारे आदेशित केल्याने ही निवडणूक पोलीस प्रशासनाचे मंडे , राठोड , ग्राप . सदस्य , यांच्या उपस्थितीत खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली .
ही निवडणूक बिनविरोध पार पडली असुन सरपंचपदी मनिषा शेखर ओव्हाळ तर उपसरपंचपदी पुन्हा दुसऱ्यांदा शिवाजी बेडके यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली .
बिनविरोध निवड जाहीर होताच गावातील भिमराव पवार , आगतराव बेडके , विलास पवार , माजी सैनिक मोहन ओव्हाळ , वसंत ओव्हाळ , केशव बेडके , चद्रकांत वाघमारे , बालाजी वाघमारे , शेखर ओव्हाळ , अजय ओव्हाळ , भिमराव रसाळ , जनक पवार आदि . ग्रामस्थ ,नागरिक यांनी समाधान व्यक्त करून सरपंच , उपसरपंच यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यास यावेळी शुभेच्छा दिल्या , या निवडणूक कामी प्रशासनाचे कर्मचारी यांचाही यावेळी ग्रामस्थांकडुन सत्कार करण्यात आला .




