Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भिमा कोरेगाव विजय शौर्यदिनी कळंब - ईटकूरात शुरविरांना मानवंदना कार्यक्रम संपन्न

भिमा कोरेगाव विजय शौर्यदिनी कळंब - ईटकूरात शुरविरांना मानवंदना कार्यक्रम संपन्न 





देशभक्त न्युज - कळंब - ईटकूर प्रतिनिधी / - 

 भिमा कोरेगावची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी, इ.स. १८१८ रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा महासंघाच्या पेशवा गटामध्ये झाली होती.  ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटन करीत होता. इंग्रजांच्या सैनिकांत 'बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी'चे सुमारे ५०० महार जातीचे सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. तर मराठ्यांच्या बाजूने २८,००० सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरे करीत होते. 

मराठ्यांच्या सैनिकांत मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता.

२८००० मराठ्यांच्या बाजूच्या सैनिकांचा खातमा व त्यांना सळोकी पळो करून सोडणाऱ्या ५०० शुरविर महार योध्यांच्या शुरपणाची आठवण करून देणाऱ्या विजय स्तंभाचा २०६ शौर्यदिन १ जानेवारी रोजी कळंब - ईटकूर येथे मोठ्या उत्साहाने बौद्ध उपासक , उपासिका अनुयाकडुन साजरा करण्यात आला .

शौर्य दिनानिमित्त कळंब शहरांमध्ये शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळा उद्यानात सर्वांनी एकत्रित येत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बुद्ध पुजा पाठ पठण केला यावेळी उपस्थित  दैनिक , साप्ताहिक  देशभक्त चे मुख्य संपादक लक्ष्मण शिंदे , माजी नगरसेवक  सुनील गायकवाड , सेवा निवृत्त शिक्षक चिलवंत बाप्पा , राजाराम  वाघमारे , माणिक नाना गायकवाड ,मोहनदादा गायकवाड , शिवाजी शिरसाठ , राजाभाऊ गायकवाड , दादासाहेब गायकवाड , बाळासाहेब समुद्रे , सुमित रणदिवे , दिलीप कसबे , कैलास जावळे ,चरणसिंह गायकवाड , भाऊसाहेब कुचेकर ,वसंत गायकवाड , किशोर वाघमारे यांच्या सह मोठ्या संख्येने बौद्ध बांधव यावेळी उपस्थित होते.

तर ईटकूर येथील विहारासमोर बौद्ध उपासक उपासिका यांनी एकत्रित येवून शौर्यदिन साजरा केला यावेळी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या  प्रतिमेची दैनिक , साप्ताहिक देशभक्तचे संपादक तथा साप्ताहिक संपादक राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट् प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण शिंदे , दै . यशसिद्धी न्युज चे जिल्हा प्रतिनिधी सुधाकर रणदिवे , मिलिंद रणदिवे , पुरुषोत्तम शिंदे आदिंच्या हस्ते  धुपाने पुष्पाने पुजा करण्यात आली . 

यावेळी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात ग्रापचे . माजी सदस्य आत्माराम रणदिवे यांनी शौर्य दिनाचे महत्व मनोगतातुन व्यक्त केले तर श्रामणेर वैजिनाथ शिंदे यांनी बुद्ध पुजा पाठ सर्वासमवेत पठण केले .

यावेळी संपन्न कार्यक्रमास माजी ग्राप . सदस्य राहुल रणदिवे , चत्रभुज रणदिवे , शिवहारी सिरसट , संतोष शिंदे , निलेश शिंदे , निलेष सिरसट , आदित्य रणदिवे , रोहित रणदिवे , लखन रणदिवे , गौतम शिंदे , पप्पु गाडे , किरण लगाडे , कृष्णा रणदिवे , कुंडलीक रणदिवे , पांडुरंग शिंदे , नाना लगाडे , विश्वजित शिंदे , पुष्पराज शिंदे , अरविंद सोणवने , बाळ आत्माराम रणदिवे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.