Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

येरमाळा प्रेस क्लबच्या नुतुन पदाधिकाऱ्यांचा सा . दै .देशभक्त च्या वतीने सत्कार

 येरमाळा प्रेस क्लबच्या नुतुन पदा धिकाऱ्यांचा सा . दै . देशभक्त च्या वतीने सत्कार 

सा . दै . आदि वृत्तपत्राचा ग्रामीण भागातील पत्रकार हाच खरा कणा  




देशभक्त न्युज - येरमाळा प्रतिनीधी

सा. दै . आदि वृत्तपत्राचा ग्रामीण भागातील पत्रकार हाच खरा कणा असल्यामुळे येरमाळा प्रेस क्लबच्या पत्रकांरांचा सा . दै . देशभक्त परिवारा कुडुन संपादक लक्ष्मण ( तात्या ) शिंदे - पाटील यांनी सत्कार करुन सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .

ग्रामीण भागातील पत्रकार हा विनावेतन मिळणाऱ्या जाहिरातरूपी कमिशनवर पत्रकारीता करीत असताना सामाजिक , राजकीय , आर्थिक , शैक्षणिक क्षेत्रातील दिल्या जाणाऱ्या बातमीतुन एखाद्या विषयास न्याय मिळाला तर त्याने दिलेल्या बातमीतु येथील व्यवस्थेवर झालेला इंन्फॅक्ट हा त्यांना मिळणाऱ्या मान - धनापेक्षा कितीतरी पटीने मोठा आर्थिक वाटतो कारण त्यांनी आपल्या बातमीदारीतुन न्याय देण्याचे काम केलेले असते.

ग्रामीण भागातील दररोजच्या घडामोडी सर्व व्यवस्थेच्या रोषाला सामोरे जावून शहरी भागापर्यंत बातम्यांच्या माध्यमातुन पोहंच - विण्याचे काम हा ग्रामीण भागातील पत्रकार प्रमाणिकपणे करतो म्हणून पत्रकार दिनाचे औचित्य व येरमाळा प्रेस क्लबचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार सा . दै . देशभक्त च्या वतीने येरमाळा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रंजित ( तात्या ) बारकुल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला यावेळी येरमाळा प्रेस क्लबचे पदाधिकारी पत्रकार कुंदन कांबळे , पत्रकार बालाजी बारकुल, पत्रकार अजय बेंद्रे,, पत्रकार प्रमोद पाटील, पत्रकार नागेश तोडकरी, पत्रकार नितीन बारकुल , पत्रकार निलेश बारकुल, संदीप बारकुल, दिगंबर गाढवे येरमाळा प्रेस क्लबचे मार्गदर्शक उद्योजक धनंजय ( बप्पा ) बारकुल , जेष्ठ पत्रकार , जाफरभाई शेख , सा .तेरणा काठचे संपादक दत्ता (बापू ) गायके यांची उपस्थिती होती .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.