ईटकूर येथील अभयसिंह अडसूळ व हेमंत पोते आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित
देशभक्त न्युज -कळंब / प्रतिनीधी -
१२ जानेवारी राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद ,राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जन्मदिवसानिमित्त संत ज्ञानेश्वर बालकाश्रम कळंब येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ माणिकराव डिकले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रा. डॉ.संजय कांबळे, साने गुरुजी कथा मालाचे जिल्हाध्यक्ष डी. के. कुलकर्णी प्रा .अरविंद खांडके ,मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड ,तांदुळवाडी गावचे सरपंच प्रणित डिकले, स्थानिक गुन्हा शाखेचे श्रीराम मायंदे, सेवा पुरस्कार समितीचे अध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे यांनी पुष्पहार अर्पण केला यानंतर स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने हरित ईटकुर ही संकल्पना घेऊन गावात वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचे कार्य केल्याबद्दल ईटकुर या गावातील युवा कार्यकर्ते अभयसिंह दत्तात्रेय अडसूळ व हेमंत राजकुमार पोते या दोन समाजसेवी युवकांचा पुरस्कार सेवा समिती यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या आदर्श समाज सेवक युवा पुरस्काराने फेटा ,शाल, श्रीफळ, पुष्पहार व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच युवा वक्ते महादेव खराटे यांच्या वाढदिवसानिमित्त शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपस्थित मान्यवर प्रमुख पाहुणे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ माॕसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे हिंदवी स्वराज्य निर्माण झाले तर स्वामी विवेकानंदांनी जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली व युवाशक्तीला आपल्या लेखनातून व्याख्यानातून या जागृत केले असल्याचे सांगून ईटकुर या गावातील युवकांनी हरित ईटकुर कल्पना घेऊन मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली याचा आदर्श घेऊन प्रत्येक गावात वृक्ष लागवड झाली पाहिजे असे विचार व्यक्त केले या कार्यक्रमासाठी मोहम्मद चाऊस, रमेश शिंदे, सचिन डोरले, विठ्ठल माने, सूर्यकांत कदम ,लक्ष्मीकांत मुंडे, कुंडलिक राक्षे , विजय सिंह पाटील, कल्याण कुंभार, निलेश पांचाळ ,नवनाथ अडसूळ ,वैभव कोठावळे ,पत्रकार संभाजी गिड्डे, प्रदीप यादव, सरस्वती अडसूळ यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव महाराज अडसूळ यांनी सूत्रसंचालन माधवसिंग राजपूत यांनी तर आभार संदीप कोकाटे यांनी मानले.
