Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खा. राजेनिंबाळकर यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी एखादी तरी योजना आणली का ? - पालकमंत्री प्रा .डॉ .सावंत

 खा . राजेनिंबाळकर यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी एखादी तरी योजना आणली का ? -पालकमंत्री प्रा . डॉ . सावंत 

मी स्फोट करून फटाके वाजवीण ते कळू पण देणार नाही 

महायुतीच्या मेळाव्यास मोठा प्रतिसाद 






देशभक्त न्युज - धाराशिव प्रतिनिधी / -

जिल्ह्याचे खासदार असलेले ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार झाल्यापासून आजपर्यंत एखादी तरी केंद्रातील विकासाची योजना आणली का ? असा थेट सवाल राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी केला.

दरम्यान, उमेदवार कोणताही असला तरी महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी त्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही दि.१४ जानेवारी रोजी त्यांनी केले.

धाराशिव शहरात महायुतीच्यावतीने मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, आ. राजेंद्र राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी खा. रविंद्र गायकवाड, युवा सेनेचे मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ॲड. मिलिंद पाटील, सुधीर पाटील, अभय चालुक्य, सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता साळुंके, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, प्रहार संघटनेचे मयुर काकडे यांच्यासह महायुतीमधील १४ घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, पडलेल्या आमदाराला खासदार करुन जीवदान देत १ लाख २८ हजार मतांनी निवडून आणले असे सांगत खा. ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. तर २०१९ च्या निवडणुकीत ते अपघाताने कोणाला तरी फसवून खासदार झाले. बापासारखे मी वागून मला धोका दिला. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील जनतेसाठी केंद्रातून एक तरी योजना आणली का ? एखादी आणली अशी एक योजना त्यांनी सांगावी हे माझे त्यांना चॅलेंज आहे. कोणी थापा मारत असेल तर त्याची जागा चौकात दाखवा असेही त्यांनी ठणकावून सांगितले. तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासह इतर बाहेरच्या नेत्यांनी लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघातील उमेदवारीच्या फंदात पडू नये व अशा नेत्यांना स्थानिक लोकप्रतिनिधींनी साथ देऊ नये. साथ देणाऱ्यांनी ते स्वत: २०२४ मध्ये आमदार कसे होतात ? हे पहावे असा सल्ला देत ते म्हणाले की कानाला लागलेल्यानी शांत रहावे, माझा स्वभाव माहिती आहे. मी कुठे स्फोट करील हे कळणार सुद्धा नाही असा इशारा त्यांनी चुळबुळ व लुडबुड करणाऱ्या नेत्यांना नाव न घेता दिला. धाराशिव लोकसभेची उमेदवारी व विकासात इतर जिल्ह्याच्या नेत्यांनी लुडबुड करु नये,‌ असे आवाहन त्यांनी केले. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून महायुतीच्या काळात आजपर्यंत कधीही मिळाला नाही एवढा निधी जिल्ह्यासाठी मिळाला आहे. मराठवाडा कृष्णा सिंचन प्रकल्पांतर्गत ११ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर मेडीकल कॉलेजसह ५०० कोटी रुपयांचे दवाखाने जिल्ह्यात होत आहेत. आरोग्यासह विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. धाराशिवला लागलेला आंकाक्षीत जिल्ह्याचा शिक्का पुसण्याचे काम आता होत आहे. आगामी लोकसभेसह सर्व निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारास निवडूण आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. मेळाव्यास भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यात पूर्वीपेक्षा सर्वाधिक विकास कामे - आ . राणाजगजितसिंह पाटील .

आगामी काळात लोकसभा, विधानसभा, जि.प., नगर परिषदच्या निवडणुका होणार आहेत. सर्व निवडणुका महायुती एकत्रीतपणे लढणार आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हे धोरण ठेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काम करीत आहेत. भारताची जगात प्रतिष्ठा वाढत आहे. महायुतीच्या काळात जिल्ह्यात यापूर्वी कधीच झाली नाहीत, एवढी कामे झाली असल्याचे आ राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. तसेच कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासह अनेक म्हत्वाची विकासकामे होत असल्यामुळे विकासाची गती आणखीन वाढत आहे. विशेष म्हणजे आगामी निवडणुकीत महायुतीचा उमेदवार कोणीही असला तरी कार्यकर्त्यांनी ताकदीने काम करून आपले कर्तव्य बजावावे, असे आवाहन आ. पाटील यांनी केले.

कार्यकार्त्यांनी जोमाने काम करावे - आ .ज्ञानराज चौगुले

महायुतीने आगामी लोकसभेसह सर्व निवडणुकीत कोणीही उमेदवार दिला तरी त्यास विजयी करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी करावा. यासाठीच आजचा मेळावा घेतला आहे. केंद्रात व राज्यात एका विचाराचे आपले सरकार असल्यानेच जिल्ह्यास भरघोस निधी मिळाला आहे. भीमा- कृष्णा स्थिरीकरण योजनेस गती देण्याचे कामही होणार आहे. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे, असे आवाहन आ. ज्ञानराज चौगुले यांनी केले.

महायुतीचा उमेदवार कोणीही असला तरी त्याला विजयी करण्यासाठी सर्वांनी काम करावे - राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष - सुरेश बिराजदार

लोकसभेसह आगामी सर्व निवडणुका महायुती एकत्रीतपणे लढणार आहे. विकासाच्या मुद्यावरच आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोणीही असला तरी त्याला विजयी करण्यासाठी सर्वांनी काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.