नामविस्तार दिना निमित्त कळंब शहरात भव्य मोटार सायकल रॅली
दुचाकी गाडीला निळे ,पंचरंगी झेंडे आणि भिमसैनिकांच्या घोषणांनी परिसर दणानला
देशभक्त न्युज - कळंब / प्रतिनीधी / -
कळंब शहरात नामविस्तार दिनानिमित्त भव्य अशी दुचाकी मोटर सायकल रॅली काढण्यात आली. हाती लहरत असलेला निळा ध्वज , पंचरंगी ध्वज, मुखी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष अशा उत्साहवर्धक वातावरणात शेकडो दुचाकी या रॅलीत सहभागी झाल्या होत्या.
कळंब शहरात नामविस्तार दिनानिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या या रॅलीची सुरुवात महाराणा प्रताप चौकातून झाली . या रॅलीत शेकडो दुचाकी सहभागी झाल्या होत्या. हातात फडकत असलेले निळे ध्वज , सोबतीला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार . अशा उत्साहवर्धक वातावरणात ही रॅली पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात दाखल झाली.
तेथून पुढे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अहिल्यादेवी होळकर चौक अशी मार्गस्थ होत ही रॅली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात पोहचली . याठिकाणी प्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला .
यानंतर बुधवंदना,पंचशील घेण्यात आले. नामविस्तार लढ्यात शहीद झालेल्या शहिदांना अभिवादन करण्यात आले. या रॅलीत जिल्हा बँकेचे संचालक डॉ संजय कांबळे , ज्येष्ठ नेते डी. जी. हौसलमल , सुनिल गायकवाड , अमर गायकवाड, सुखदेव गायकवाड , बंडुभाऊ बनसोडे , सतपाल बनसोडे , अनिल हजारे , डी.टी.वाघमारे, राहुल हौसलमल ,किशोर वाघमारे , राजाभाऊ गायकवाड , शिवाजी सिरसट , अभिजित हौसलमल ,सचीन गायकवाड ,भैय्यासाहेब देशमाने , कुणाल मस्के , संजीत मस्के , प्रमोद ताटे, सिद्धार्थ वाघमारे , विनोद समुद्रे , परमेश्वर समुद्रे , अशोक कसबे, आकाश गायकवाड , सुरज वाघमारे आदी मोठ्यासंख्येने भिनसैनिक सहभागी झाले होते.

