शिवमती अशाताई गोरख मोजनकर राज्यस्तरीय त्रिरत्न महिला आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित
देशभक्त न्युजु - परंडा प्रतिनिधी / -
फारुकभाई शेख
महाराष्ट्र महिला विकास मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिवमती आशाताई गोरख मोरजकर यांना मा. आमदार सुमनताई पाटील, मा. खासदार संजयकाका पाटील, एल. डी. म्हेत्रे, संस्थापक/अध्यक्ष कालिंदीताई पाटील याच्या शुभहस्ते "राज्यस्तरीय त्रिरत्न महिला प्रेरणा आदर्श शिक्षिका " पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जिजाऊ, सावित्री, रमाई यांच्यासारख्या समाजसुधारकांची आठवण म्हणून आपले कार्य व त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढीने घ्यावी व यातुनच देशाची नवी पिढी घडावी यासाठी महाराराष्ट्र विकास मंच कार्य करीत असुन त्याच एक भाग म्हणून महाराष्ट्र महिला विकास मंचच्या माध्यमातुन शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट शिवमती अशाताई गोरख मोरजकर या शिक्षिका म्हणून उल्लेखनीय कार्य करत आहेत. व अशा व्यक्तीमत्वाची समजायला गरज आहे म्हणून त्यांच्या कार्यास व पुढील वाटचालीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र महिला विकास मंचच्या वतीने पुरस्कार देवून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
