परांजा येथील हजरत खाँजा बद्रोदिन शहिद यांच्या ७०४ व्या उरुसास २० जानेवारी पासुन सुरुवात
या कार्यक्रमातुन सर्व धर्म समभावनेचे घडते दर्शन
परंडा तालुक्याचे ग्रामदैवत म्हणून हिंदु- मुस्लिम बांधव एकत्र येवून कार्यक्रम होतो संपन्न
देशभक्त न्युज - परंडा प्रतिनिधी / - फारुक शेख / -
परंडा तालुक्याचे ग्रामदैवत व सर्व धर्मीयांचे श्रध्दास्थान असलेल्या सुफी संत हजरत खाॅजा बद्रोद्दीन शहिद ए आजम यांच्या उरूसा निमीत्त शहरात २० जानेवारी रोजी 9 वाजता इमाम बाडा येथून कलस काडन्यात आला व ते कलस दर्गा येथे नेहन्यात आले व 5 वाजता मुख्य संदल मिरवणूक निघणार असुन या उरुसा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदू-मुस्लिम बांधवाचे श्रृध्दास्थान असलेल्या सुफी संत हजरत ख्वाजा बद्रोद्दीन शहिद ए आजम यांच्या उरूसा निमीत्त कव्वाली, मुशायरा, कलगीतूरा भक्तीगीत हिंदी मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवारी ता.२० जानेवारी रोजी परंपरे नुसार तहसील कार्यालयातुन तहसीलदार यांच्या डोक्यावर फुलांची चादर देऊन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता संदल तहसील कार्यालयातून ते आंबेडकर चौक शिवाजी चौक टिपू सुलतान चौक व मंडई येथून मिरवणूक शहरातुन निघणार आहे.संदल मिरवणूक रात्री १० वाजता दर्गाह येथे पोचून फातेहा खॉनी व प्रसादाचे वाटप
करण्यात येणार आहे.यावेळी दर्गाह मैदानावर भव्य अशी अतिषबाजी करण्यात येणार आहे
रविवारी ता. २१ जानेवारी रोजी प्रसिद्ध कव्वाल .हाजी असलम साबरी यांचा दर्गाह मैदानावर रात्री ८ वाजता कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. मंडई पेठ येथे सकाळी ९ वाजता कलगी तूरा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
सोमवारी २२ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता आठवडा बाजार येथे भारतातील प्रसिद्ध कवी, शायर यांचा मुशायऱ्या चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. व मंगळवारी २३ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता आठवडा बाजार येथे सारेगम फेम . शर्मीला शिंदे यांच्या 'नादवेद 'प्रस्तूत भक्ती गीत , हिंदी मराठी सदाबहार गीतांचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. बुधवारी २४ जानेवारी रोजी रात्री आठवडा बाजार मैदानावर मौलाना मुफ्ती शमशोद्दीन कादरी , राजस्थान मकराना यांचा समाजप्रबोधनाचा वाज बयानचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती संदल ऊरुस कमिटीच्यावतीने देण्यात आली आहे
