वारंवार ग्रामस्थांकडुन सरपंच , तत्कालीन ग्रामविकास अधिकारी , प्रभारी ग्रामविकास अधिकारी , कर्मचारी यांना तोंडी सुचना देवूनही कांहीच फरक पडेना
कर्तव्यात कसुर करून हेतुपुरस्पर जाणून बुजुन महापुरुषांची अवहेलना करणाऱ्या व कायदा सुव्यस्थेचा प्रश्न उभा करणाऱ्या सरपंच , ग्रामविकास अधिकारी , कर्मचारी यांच्या कार्यप्रणाली विरुद्ध १०६ ग्रामस्थांचे स्वाक्षरी निशी कारवाईसाठी निवेदन
तालुका स्तरावरील उपविभागिय अधिकारी कार्यालय , पोलीस स्टेशन , तहसिल कार्यालय , पंचायत समिती कार्यालयात आजच्या दिनी भारताला संविधान देणाऱ्या भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा भारताचे संविधान देत असतानाच्या फोटो प्रतिमाचे पुजन , राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमाचे पुजन , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन केले जाते परंतु ईटकूर ग्रामपंचायत सरपंच , ग्रामविकास अधिकारी , कर्मचारी वर्ग मात्र " हम करे सो कायदा" या अविर्भावात मनमानी पद्धतीने कामकाज करीत असुन त्यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी महपुरुषांच्या अवहेलना प्रकरणी ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या
देशभक्त न्युज - ईटकूर प्रतिनिधी / -
प्रशासन स्तरावरील साजरे होणारे राष्ट्रीय सण उत्तवा वेळी ज्या त्या कार्यक्रमाचे महत्व समजून घेवून कार्यक्रम साजरे करण्या संदर्भात ईटकूर ग्रामपंचायतचे सरपंच , ग्रामविकास अधिकारी , कर्मचारी यांना वारंवार ग्रामस्थांनी चर्चा करून सांगूनही त्यांच्यात कांहीच फरक पडत नसुन २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनी भारताला संविधान देणाऱ्या भारतरत्न महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा पुजेसाठी फोटो प्रतिमा न लावण्याचा सरपंच , ग्रामविकास अधिकारी ,कर्मचारी यांनी महाप्रताप दाखला असुन महापुरुषांच्या आजच्या दिनी झालेल्या अवहेलने मुळे ग्रामस्थांच्या सरपंच , ग्रामविकास अधिकारी , कर्मचारी यांनी जाणून बुजुन त्यांच्या कर्तव्य कारभारातील केलेल्या वर्तनामुळे समस्त ग्रामस्थांच्या , समाज बांधवांच्या भावना दुखावल्याने ग्रापच्या सरपंच , ग्राम विकास आधिकारी , कर्मचारी यांच्या कारभाराचा ग्रामस्थां कडून निषेध करून तहसिलदार , पोलीस उपविभागिय अधिकारी ,पोलिस स्टेशन कळंब यांना निवेदन देवून संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी १०६ ग्रामस्थांच्या स्वाक्षरी निशी लेखी तक्रारी निवेदनाद्वारे करण्यात आली असुन प्रातिनीधीक स्वरूपात हे निवेदन लक्ष्मण शिंदे , सुधाकर रणदिवे , रिलश लगाडे , अमोल रणदिवे , निलेष शिंदे यांनी दिले असुन
संबंधितावर तात्काळ कारावाई न झाल्यास अमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे .

