ईटकूर ग्रामपंचायत समोर स्मशान भूमिप्रश्नी लिंगायत समाज व नविन पाणीपुरवठा योजने संदर्भात उपसरपंच ग्राप . सदस्य , ग्रामस्थ यांच्या अमरण उपोषणाने ईटकूर दणानले
आद्यापर्यंतच्या इतिहासात ग्राप . प्रांगणात विविध प्रश्नी प्रथमच आमने सामने उपोषणे .
ईटकूर ग्रापची मात्र प्रशासन स्तरावर चर्चाच चर्चा प्रशासनांच्या अधिकारी वर्गाची दोन्ही उपोषण कर्त्यांना मार्ग काढण्यासाठी विनंत्या आंदोलन कर्ते मात्र आपआपल्या मागण्यावर ठाम
दुपारी चर्चेतुन ग्राप . उपसरपंच , सदस्य यांच्या मागण्या संदर्भात सोमवारी मार्ग काढण्याच्या लेखी आश्वासना नंतर तुर्तास त्यांचे अमरण उपोषण मागे .
देशभक्त न्युज - ईटकूर प्रतिनीधी / -
कळंब तालुक्यातील ईटकूर ग्रामपंचायतच्या कार्यकालातील इतिहासात प्रथमच ग्रामपंचायत सत्ताधारी व विरोधक यांच्यात गावात राबविण्यात येत असलेल्या नविन पाणीपुरवठा योजने संदर्भात सदरील काम चुकीचे होत असल्या बद्दल १५ पैकी उपसरपंच विलास देविदास गाडे यांच्यासह ग्राप सदस्य लक्ष्मण सुब्राव आडसुळ , गुंडेराव पांडुरंग गंभीरे , सौ . कविता प्रदिप फरताडे , सौ . अश्विनी दत्तात्र्य बावळे , सौ . सिमा दिनकर क्षिरसागर , सौ . प्रमिला आबासाहेब आडसुळ , यांच्यासह ग्रामस्थ हे ईटकूरच्या होणाऱ्या नविन पाणीपुरवठा योजनेतुन कोठाळवाडी अंतर्गत येणाऱ्या वस्त्यांना पाणी देण्यात येवू नये , टाकलेली पाईपलाईन काढुन घेण्यात यावी , या योजनेतुन शेतीसाठी करण्यात आलेली पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन काढुन घेण्यात यावी , ईटकूर व गावअंतर्गत राहिलेल्या पाईप लाईनसाठी नव्याने सर्व्हे करण्यात यावा , कोठाळवाडीला पाणी देण्याचा सर्व्हे कोणी केला याची ईटकूर येथील सर्व ग्रामस्थांना माहिती देण्यात यावी या मागण्यासाठी ग्राप . विरोधी सदस्यांचे २६ जानेवारी सकाळी १० वाजल्यापासुन अमरण उपोषणास बसले होते दुपारी संबंधित विभागाच्या अधिकारी यांच्याकडुन सोमवार पर्यंत आंदोलन कर्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याच्या लेखी आश्वासना नंतर त्यांनी आपले अमरण उपोषण मागे घेतले तर समोरच आपला पेंडॉल उभारून लिंगात समाज बांधवांचे समशान भूमिप्रश्नी अमरण उपोषण सुरु असुन त्यांनीही प्रशासन स्तरावर दिलेल्या निवेदनाद्वारे अशी मागणी केली आहे की , ३०० वर्षापासुन लिंगायत समाज बांधवांची पिढीजात स्मशान भूमित दफन केलेली प्रेते उकरून त्याची विल्हेवाट लावणाऱ्या समाज कंटकावर वारंवार तक्रारी देवूनही प्रशासन स्तरावरून कोणतीही कार्यवाही होत नाही . स्मशान भूमिचा प्रश्न सोडविण्यात आलेला नाही अशा प्रशासन स्तरावरील संबंधित गैरकारभारा बद्दल व स्मशान भूमिचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत अमरण उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा लिंगात समाज बांधवांनी घेतला आहे .
प्रशासन स्तरावरील संबंधित अधिकारी सध्यातरी या दोन्ही उपोषण कर्त्यांच्या मागण्या संदर्भात कांही मार्ग काढता येवू शकतो का ? या धावपळीत असुन २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ईटकूर ग्रामपंचायत मात्र नक्कीच आंदोलन कर्त्यांच्या विविध मागण्यांच्या माध्यमातुन अद्या पपर्यंतच्या इतिहास कार्यकालात तालुकास्तरावर मोठ्या चर्चेत आली आहे .

