श्रीमती सुरेखा खंबायत याना आदर्श शिक्षिका पुरस्काराने धाराशिवचे पालकमंत्री प्रा . डॉ . तानाजीराव सावंत यांच्या हस्ते सन्मानित
देशभक्त न्युज - परंडा प्रतिनिधी / -
परंडा येथे राजविरा फक्सन हॉल येथे २५ जानेवारी २०२४ रोजी धाराशिव जिल्हयाचे पालक मंत्री अरोग्य व कुंटुब कल्याण मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते देवगाव खु ) ता परंडा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका सौ सुरेखा भगवान खंबायत यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे सुरेखा खंबायत यांनी १९ ९८ यासाली हयत्ता १२वी देवून प्रथमश्रेणी घेवून उत्तीर्ण झाल्या घरची परिस्थिती हलाकीची आसताना सुरेखा यांनी ऑक्टोबर १९९८ रोजी डिएड ला प्रवेश घेतला परिस्थितीची जाणीव ठेवुन सुरेखा यांनी सन २००० या साली डिएड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होवुन डिएएड पूर्ण केले सुरेखा भगवान खंबायत यांनी २७/ १० २००१ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नोकरीत सुरुवात केली या शाळेत त्यांनी विवीध उपक्रम राबवले विद्यार्थ्याची गुणवत्ता व पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले २०१२ मध्ये आसु येथील जि प शाळेत बदली झाली त्यांनी तेथे ६ वर्ष सेवा बजावली २०१८ मध्ये त्यांनी देवगाव (खु) ता परंडा येथे आज पर्यंत कार्यरत आहेत त्यांनी प्रथम शाळेत वृक्षारोपण केले विद्यार्थ्याची १०० % उपस्थित ई लर्निक च्या माध्यमातून संगणकावर अध्यापन सुरु केले अशा विवीध उपक्रम राबवुन त्यांनी यश मिळवले त्यांच्या केलेल्या कामाची दखल घेत परंडा गटशिक्षण कार्यालयानी सन २०२२ / २०२३ आदर्श शिक्षक पुरस्कार राज्याचे अरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवुन गौरवण्यात आले यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत माजी जि प सभापती दत्ता आण्णा सांळुके माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर माजी नगर अध्यक्ष सुभाषसिंह सद्धीवाल जिल्हा परिषद धाराशिव मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता शिक्षण अधिकारी सुधा सांळुखे गरविकास अधिकारी संतोष नागटिळक यांच्यासह विवीध मान्यवर उपस्थित होते
