Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नळदुर्ग तालुका निर्मितीसह शहराच्या सर्वांगिण विकासात्मक कमासाठी सर्व मतभेद विसरून माजीमंत्री चव्हाणांच्या पाठीशी खंबीर उभे राहु - राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळेंची पत्रकार परिषदेत माहिती

 नळदुर्ग तालुका निर्मितीसह शहराच्या सर्वांगिण विकासात्मक कमासाठी सर्व मतभेद विसरून माजीमंत्री चव्हाणांच्या पाठीशी खंबीर उभे राहु 

- राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळेंची पत्रकार परिषदेत माहिती 

मागचे सर्व विसरून नळदुर्ग शहराचे जे महत्वाचे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी पक्षिय राजकारण बाजुला ठेऊन सर्वांनी एकदिलाने काम करण्याची आज गरज आहे. नळदुर्ग तालुका निर्मितीसह अन्य महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा,तसेच यासाठी होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले तर केवळ शहर विकासासाठी मी त्यांच्या पाठीशी उभे राहीन असे अशोक जगदाळे

राष्ट्रवादी काँगस पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या पत्रकार परिषदेतुन विकासाच्या मुद्यावर ऐक्याच्या अवाहनाला माजीमंत्री मधुकरराव चव्हाण कसा प्रतिसाद देणार हा प्रश्न गुल दस्त्यात आहे .





देशभक्त न्युज - नळदुर्ग प्रतिनिधी - ( सुहास येडगे यांज कडुन

नळदुर्ग शहराचे प्रलंबित असलेले नळदुर्ग तालुका निर्मितीसह महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी पुढाकार घेतला तर सर्व राजकीय मतभेद बाजुला ठेऊन मी शहराच्या विकासासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीन असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांनी नळदुर्ग येथे आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत बोलताना सांगितले.

        दि.३१ जानेवारी रोजी नळदुर्ग शहरांतील प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी तसेच ते प्रश्न तात्काळ सोडवुन शहराचा विकास व्हावा याबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी पत्रकार परीषद आयोजित केली होती.

       यावेळी बोलतांना अशोक जगदाळे यांनी म्हटले की नळदुर्ग शहरातील महत्वाचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासुन शासन दरबारी प्रलंबित आहेत. आजपर्यंत हे प्रश्न सुटले नाहीत म्हणुन शहराचा विकास होऊ शकला नाही. आज शहरात रोजगाराचे एकही साधन उपलब्ध नसल्याने शहरांतील बेरोजगार युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधीनी हे प्रश्न का सोडविले नाहीत हा एक प्रश्नच आहे. ज्यांनी २५ वर्षे सत्तेत घालविले त्यांनीही नळदुर्ग शहराचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले? असा प्रश्न अशोक जगदाळे यांनी उपस्थित केला. नळदुर्ग तालुका निर्मिती, नळदुर्ग शहरात औद्योगिक वसाहत निर्माण करणे, नळदुर्ग शहरात अप्पर तहसिल कार्यालय सुरू करणे, नळदुर्ग शहरात स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करणे हे प्रश्न अनेक वर्षांपासुन प्रलंबित आहेत. केवळ हे प्रश्न सुटले नाहीत म्हणुन शहराचा विकास होऊ शकला नाही असेही अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे. मागच्या कांही दिवसात माजी आमदारांनी राज्याचे माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांनी नळदुर्ग तालुका निर्मितीला विरोध केले असल्याचे सांगितले. मात्र डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यानंतर असलेल्या मंत्र्यांनीही नळदुर्ग तालुका निर्मितीचा प्रश्न सोडविला नाही. गेल्या अनेक वर्षांपासुन शहरवासियांना केवळ आश्वासनावर झुलवत ठेवण्याचे काम लोकप्रतिनिधीनी केले आहे. माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी नळदुर्ग परीसरात दोन उच्च पातळीचे बंधारे बांधले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र नळदुर्गकरांचा जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा तालुका निर्मितीचा प्रश्न मात्र आजही तसाच प्रलंबित आहे हे नाकारता येत नाही असेही अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे.

      मागचे सर्व विसरून नळदुर्ग शहराचे जे महत्वाचे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी पक्षिय राजकारण बाजुला ठेऊन सर्वांनी एकदिलाने काम करण्याची आज गरज आहे. नळदुर्ग तालुका निर्मितीसह अन्य महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा,तसेच यासाठी होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले तर केवळ शहर विकासासाठी मी त्यांच्या पाठीशी उभे राहीन असे अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे.

      शहर विकासासाठी एक पाऊल मागे येण्याची माजी तयारी आहे. शेवटी निवडणुका लागल्यानंतर कशी निवडणुक लढवायची हे त्या, त्या वेळी पाहता येईल. चांगल्या कामाचे आम्ही कौतुकच करतो., मात्र जे प्रलंबित प्रश्न आहेत आणि ज्या प्रश्नामुळे नळदुर्ग शहराचा विकास आजपर्यंत होऊ शकला नाही त्यासाठी ते प्रश्न सोडवण्यासाठी मी एक पाऊल मागे येऊन जे कोणी हे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.