राहुल घुले यांचे समाज सेवा भावनेतुन भूम , परंडा , वाशी तालु क्यातील मुला मुलींच्या लग्नासाठी मोफत मंगल सेवा सुविधा केंद्र सुरु
कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनीधींनी सामाजिक कार्यासाठी सुचाविल्यास नक्कीच सहकार्य करू - समाजसेवक राहुल भिमराव घुले .
देशभक्त न्युज - भूम प्रतिनिधी
राजकारण विरहित समाजसेवा करणार कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधीसाठी आमच्याकडे समाजसेवा करण्याचे कार्य सांगितल्यास त्यांचही स्वागत असेल असे राहुल भिमराव घुले यांनी जाहीर करत नूतन समजसेविची संकलपना दिनांक २६ फेब्रुवारी सोमवार रोजी शासकीय विश्रामगृह भूम येथे पत्रकार परिषद घेऊन भूम परांडा वाशी तालुक्यातील मुलींच्या लग्नासाठी मोफत मंगल सेवा सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या सुविधेच्या माध्यमातून वधु-वरांना बसण्यासाठी आकर्षक खुर्ची (राजाराणी खुर्ची) संच,लग्नातील पाहुण्यांना बसण्यासाठी खुर्च्या,जेवण बनवण्यासाठी लागणारी भांडी तसेच जेवण वाढण्यासाठी लागणारी भांडी,आसन पट्ट्या,चटई यासारख्या सुविधा कोणतेही भाडे न आकारता अगदी मोफत स्वरूपात देण्यात येणार असून आपले काम झाल्यानंतर या सर्व वस्तू कार्यालयात परत जमा करणे बंधनकारक राहणार आहे.या सुविधेचा जास्तीत जास्त नागरीकांनी फायदा करावा असे आवाहन भूमिपुत्र डॉ.राहुल भिमराव घुले यांच्या वतीने करण्यात येत आहे. या प्रसंगी गाढवे हरिष, नितीन गुंजाळ, ऍड कुटे, शहानवाज आर के, नितिन गुंजाळ आदी उपस्थित होते.
