Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बंडुआबा ताटे सुभाषचंद्र बोस जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

 महाराष्ट्र पोलीस मित्र असोशियन (म. रा .)  च्या वतीने बंडुआबा ताटे यांना  सुभाषचंद्र बोस जीवन गौरव पुरस्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मानपूर्वक प्रदान 

देशभक्त न्युज - कळंब प्रतिनिधी / -




ताटेंना मिळालेला पुरस्कार म्हणजे  निस्वार्थी सामाजिक कार्याचा सन्मान झाल्याची चर्चा 

 कार्यकर्त्यांनी पुरस्कारासाठी काम करू नये उत्तम आणि समाज उपयोगी व राष्ट्रीय बंधुत्व जपण्याचे कार्य केल्यास आणि समाजातील तळागाळातील लोकांच्यासाठी कार्य करणाऱ्या लोकाचां असा सत्कार होतोच - दत्तात्रयगिरी

महाराष्ट्र पोलीस मित्र असोशियन (म. रा .) यांच्या वतीने दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी लातूर येथील पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला होता आणि त्याप्रसंगी कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी  दत्तात्रय गिरी ,उप मुख्य आधिकारी जि.प लातूर तर प्रमुख पाहुणे म्हणून अनिसखान पठान असोशियन चे प्रदेश आध्यक्ष आणि हभप महादेव महाराज आडसुळ जेष्ट नागरीक महासंघ जिल्हाध्यक्ष धाराशिव , सुभाष घोडके सा. पावन ज्योत चे संपादक , साहेबअली सौदागर  प्रावक्ता मुस्लीम विकास परिषद व उषाताई धावारे मराठवाडाअध्यक्ष ,असोशियन म.रा , गंगासागर ढवळे लातूर जिल्हाध्यक्ष असोशियन , चंद्रकांत वायाळ , सिद्धार्थ कवटेकर व सुफी सय्यद शमशोद्दीन महाराष्ट्र पोलीस मित्र असोशियन चे संस्थापक सचिव हे उपस्थित होते .





या प्रसंगी  दत्तात्रयगिरी म्हणाले की कार्यकर्त्यांनी पुरस्कारासाठी काम करू नये उत्तम आणि समाज उपयोगी व राष्ट्रीय बंधुत्व जपण्याचे कार्य केल्यास आणि समाजातील तळागाळातील लोकांच्या साठी कार्य करणाऱ्या अशा लोकाचां सत्कार होतोच . असे मत त्यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले . यावेळी सर्व पुरस्कार मानकरी यांचे अभिनंदन आले आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी आपले विचार मांडताना हभप .महादेव महाराज आडसुळ म्हणले की गेली 20 वर्षापासून महाराष्ट्र पोलीस मित्र असोशियन हे तळागळातील विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या लोकांचा सन्मान करत आहे . त्याबददल या अशोशियन चे त्यांनी  अभिनंदन केले . यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कला , क्रीडा शिक्षण , संस्कृतीक औद्योगिक ' , सामाजिक व इतर क्षेत्रातील कार्य करणाऱ्या  20 मान्यवरांना नेताजी सुभाषचंद्र बोस जिवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले या  पुरस्कारामध्ये कळंब येथील विविध सामाजीक क्षेत्रामध्ये. कार्य करणारे बंडुआबा ताटे यांना हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र , ट्रॉपी शाल पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला . यावेळी महाराष्ट्र पोलीस मित्र असोशियन ( म.रा ) सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्र गिताने सुरु करण्यात संपन्न झालेल्या  कार्यक्रमाचे सुत्र संचालन कुमारी अंकिता माकणे यांनी केले तर शेवटी आभारप्रदर्शन सुरज मांदळे यांनी मानले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.