सर्वांवर सोलापूर येथील विविध रुग्णालयात उपचार सुरु
१५ वर्ष मुलाची प्रकृती गंभीर , वसंतनगर मधील ३० जणांचा सामावेश
देशभक्त न्युज / नळदुर्ग - सुहास येडगे
शेळीचे मटण खाल्ल्याने नळदुर्ग येथील वसंतनगर मधील ३० जणांना अन्नविषबाधा झाली असुन या सर्वांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या यांची प्रकृती स्थिर असुन एका १५ वर्षे मुलाची प्रकृती मात्र गंभीर असुन त्याच्यावर सोलापुर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वसंतनगर येथील एका व्यक्तीने शेळी कापुन त्याचे वाटे घातले होते. वसंतनगर मधील जवळपास १८ कुटुंबांनी हे मटण घरी नेले होते. सोमवारी दुपारी आणि संध्याकाळी हे मटण खाल्यानंतर ज्यांनी हे मटण खाल्ले त्यांना मंगळवार पासुन जुलाब, उलटी, ताप व थंड वाजुन येणे असे प्रकार सुरू झाले. या १८ घरातील ३० व्यक्तींना हे शेळीचे मटण खाल्ल्याआनंतर अन्नविषबाधा झाली. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. ज्या व्यक्तीने शेळी कापुन वाटे घातले आहे ती शेळी आजारी आजारी असताना कापली होती असे तेथील नागरीक सांगत आहेत. आजारी असलेल्या शेळीचे मटण खाल्ल्यानेच ही विषबाधा झाली असल्याचे बोलले जात आहे.
वसंतनगर मधील अश्विनी राठोड वय २७ वर्षे, संकेत राठोड वय १४ वर्षे, जेतालाल राठोड, आशा राठोड, मोताबाई राठोड, दत्ता राठोड, अंकीता राठोड, श्रीकांत संजय राठोड वय १५ वर्षे व रीतेश राठोड वय दीड वर्षे यांच्यासह ३० जणांना अन्न विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या व्यक्तींवर नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालय, पाटील क्लिनिक, नरवडे दवाखाना व सोलापुर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील श्रीकांत संजय राठोड वय १५ वर्षे याची प्रकृती गंभीर असुन त्याच्यावर सोलापुर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डॉ. जितेंद्र पाटील यांनी म्हटले आहे की, या सर्वांनी शेळीचे मटण खाल्ल्याने त्यांना अन्नविषबाधा झाली आहे. सध्या यांची प्रकृती स्थिर असुन संपुर्ण बरे होण्यासाठी ४८ तास लागतात असेही डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.,

