Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वंचित चे नेते ॲड .प्रकाश आंबेडकर आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे - पाटील यांच्या युती ने महाविकास अघाडीला आंबेडकरांचा धक्का ... !

 वंचित चे नेते ॲड .प्रकाश आंबेडकर आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे - पाटील यांच्या युती ने महाविकास अघाडीला आंबेडकरांचा धक्का ... !



वंचित बहुजन आघाडी कडून लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर 

देशभक्त न्युज - अकोला  

लोकसभेच्या रणधुमाळी सुरु असतानाच आता राज्याच्या राजकारणात नविन वळण आले आहे. ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड . प्रकाश आंबेडकर यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, नव्या आघाडीची घोषणा केली. दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंसोबत आघाडी केल्याने व त्यांनी महाविकास आघाडी बाबत विचारलेल्या प्रश्नांना दुजोरा दिल्याने व त्यांनी लोकसभेसाठी जाहिर केलल्या उमेदवारी वरून ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यावर असेच चित्र स्पष्ट होत आहे .

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले की, काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झाले. काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो. विस्ताराने आमचे बोलणे झाले. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला. मुस्लिम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचे समर्थन असेल. ते त्यांची अंतिम भूमिका ३०तारखेला घेतील. जरांगेंनी ३० तारखेपर्यंत थांबायची विनंती केली. त्यांची ही विनंती मान्य करण्यात आल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड . प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले .

वंचित कडुन उमेदवारांची पहिली यादी जाहीर

भंडारा-गोंदिया – संजय गजानन केवट (दिवर समाज) ,गडचिरोली-चिमूर – हितेश पांडुरंग मडावी (गौंड समाज) ,चंद्रपूर – राजेश वारलुजी बेले (तेली समाज) ,बुलडाणा – वसंत राजाराम मगर ,(माळी समाज) अकोला – प्रकाश आंबेडकर ,अमरावती – प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान (राखीव) ,वर्धा – प्राध्यापक राजेंद्र साळुंखे(कुणबी) , यवतमाळ-वाशिम – खेमसिंग प्रतापराव पवार (बंजारा) ,नागपूर – काँग्रेसला समर्थन ,सांगली – ओबीसी बहुजन पार्टीची स्थापना झाली असून प्रकाश शेंडगे लढत असतील तर त्यांना पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले .

मुस्लिमांना उमेदवारी, जैन समाजातलाही उमेदवार

भाजपाने मुस्लिमांच्या आयसोलेशनचे राजकारण सुरू केले आहे. त्याला थांबवण्यासाठी या लोकसभेमध्ये मुस्लिम उमेदवारसुद्धा उतरवायचे आणि त्यांनाही उमेदवारी द्यायची. जैन समाजाचाही उमेदवार उतरवरून त्याला जिंकून आणायचं निश्चित झालं आहे. महाराष्ट्रात उपेक्षितांची, वंचितांची आणि गरीब मराठा, मुस्लिम आणि इतर समाजाची नवीन वाटचाल आम्ही या माध्यमातून मांडत आहोत. या वाटचालीला समूह पाठिंबा देईल अशी आमची अपेक्षा आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.