मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांनी वंचितचे नेते ॲड . प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलेल्या पाठींब्याचा दावा फेटाळला
देशभक्त - न्युज / जालना
वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड . प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली, पण मी अजून वंचित आघाडीला पाठिंबा दिलेला नाही. ३० मार्चपर्यंत आमचा निर्णय जाहीर करू,’’ असे स्पष्ट करत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या पाठिंब्याचा दावा फेटाळला आहे.
ॲड .प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुसाठी राज्यातील ‘वंचित’च्या ८ उमेदवारांची पहिली यादी आज (दि.२७) जाहीर केली. ‘वंचित’ने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी केली असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. जरांगे पाटील यांचा आम्हाला पाठिंबा राहणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र त्यांचा हा दावा जरांगे पाटील यांनी फेटाळला आहे.

