नॅचरल डेअरीचे दूध उत्पादकांना बायोगॅस संच खरेदीवर रू.5,000/-अनुदान देणार- बी.बी.ठोंबरे
देशभक्त न्युज - शिराढोण / प्रतिनिधी
नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. रांजणी या कारखान्याच्या नॅचरल डेअरी विभागाने कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांची इंधनाची निकड लक्षात घेवून, उर्जा बायो सिस्टीम प्रा.लि.कंपनीचे बायोगॅस संच खरेदीवर रू. 5,000/- अनुदान देणार असल्याचे नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांनी सांगितले. सदरची बायोगॅस संच बसवणेची योजना ही नॅचरल डेअरीचे दूध संकलक यांचे मार्फत राबवणार असल्याचेही त्यांनी आवर्जून यावेळी सांगितले.नॅचरल डेअरीचे दूध उत्पादक व पशुपालक मेळाव्याचे निमित्ताने नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांनी डेअरीचे कामकाजा बाबत समाधान व्यक्त करून नॅचरल डेअरीचे कार्यक्षेत्रामध्ये दूध उत्पादकांना बायोगॅस उत्पादक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्या दूध उत्पादकांकडे जास्तीचा बायोगॅस शिल्लक राहत असेल अशा बायोगॅस उत्पादकांकडून नॅचरल शुगर बायोगॅस हमीने खरेदी करणार असून त्यापासून नॅचरलचे सीएनजी प्रकल्पामध्ये सदर बायोगॅस पासून सीएनजी उत्पादन घेणार असल्याचे बी.बी.ठोंबरे यांनी सदर प्रसंगी आवर्जून सांगितले. म्हणजेच दूध उत्पादक शेतक-यांना नॅचरल डेअरी आता ‘‘अन्नदाता बरोबरच उर्जा दाता’’ ही बनवणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.दुष्काळी परिस्थिती मध्ये मराठवाडया मधील शेतक-यांना बळ देणेसाठी उर्जा बाो सिस्टीम प्रा.लि.पुणे चे गजानन पाटील यांनी बायोगॅस संदर्भात सविस्तर माहिती देवून बायोगॅस शेतक-यांच्या इंधन आणि आॅरगॅनीक खतासंबंधीत कसा फायद्याचा आहे हे आवर्जून सांगितले. तसेच त्यांनी सदर बायोगॅस संच रू.55,000/- किंमतीचा टाटा फौंडेशनचे सीएसआर अनुदान, शासन अनुदान सोडून सदरचा बायोगॅस संच हा रू. 15,000/-मध्ये बसणार असल्याचे सांगितले. त्यामध्ये नॅचरल डेअरी मार्फत रू 5,000/- चे अनुदान जाता रू.10,000/- मध्ये बायोगॅस बसतो. नॅचरल डेअरीचे वर्धापन दिनाचे औचित्य साधून गजानन पाटील यांनी जे दूध संकलक जास्तीत जास्त बायोगॅस संच बसवतील त्यांना रोख बक्षीसे देण्याचेही त्यांनी जाहीर केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नॅचरल शुगरचे संचालक कृषिभुषण पांडूरंग आवाड यांनी केले तर डाॅ.सर्जेराव साळंुके यांनी उपस्थितांचे आभार मानले.सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक, प्रवर्तक, डेअरीचे अधिकारी, कर्मचारी नॅचरल डेअरीचे 13 व्या वर्धापन दिन सोहळयास उपस्थित होते.
