Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महापुरुषांच्या जयंत्या सामाजिक उपक्रमातुन साजऱ्या करणे काळाची गरज - पोनि . सानप

 महापुरुषांच्या जयंत्या सामाजिक उपक्रमातुन साजऱ्या करणे काळाची गरज  - पोनि . सानप




स्वतः स व इतरांच्या जिवनाश हानिकारक ठरणाऱ्या डिजेवर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा सार्वजनिक हिताचे कार्यक्रम राबवा

देशभक्त - न्युज ईटकूर / प्रतिनिधी

भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने ईटकूर येथील बुद्ध विहारात शांतता कमिटी बैठकीच्या माध्यमातुन जयंती अनुषंगाने चर्चा करण्यात आली यावेळी कळंब पोलिस स्टेशनचे  पोलिस निरीक्षक सानप यांनी उपस्थित भिमगर येथील समाज बांधव व गावतील नागरिक यांच्याशी संवाद साधताना म्हणाले की , सध्याच्या काळात सर्वच महापूरुषांच्या जयंत्या या सामाजिक उपक्रमातुन साजऱ्या होणे काळाची गरज आहे .

ईटकूर येथील बुद्ध विहारात दि . २७ मार्च रोजी सायंकाळी ७ ३० वाजता समाज बांधवांनी आयोजि केलेल्या बैठकीस बोलताना सानप असेही म्हणाले की , स्वतःस व इतरांच्या जिवनाश हानिकारक ठरणाऱ्या डिजेवर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा सार्वजनिक हिताचे कार्यक्रम राबवा , आज डिजेच्या कर्कश आवजाने अनेकांना आपले जिव गमवावे लागले आहेत . आपण लाखो रुपये देवून चक्क  मृत्युलाच आमंत्रण देतो ही गंभीर बाब आपण लक्षात घेणे गरजेचे आहे . याबरोबरच येथील जयंती महोत्सव समिती प्रतिवर्षी सार्वजनिक हिताचे उपक्रम राबवते याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदण ही केले .


बैठकीच्या प्रारंभी जगला शांततेचा मार्ग दाखवणारे तथागत शाक्यमुनी  तथागत गौतम बुद्धाच्या मुर्तीची पोनि .सानप , सरपंच मोहराबाई कसपटे , बीट आंमलदार तांबडे , यांच्या हस्ते मेणबत्ती , उदबत्ती प्रज्वलीत करून पुष्प ठेवून आणि भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीची सुरुवात करण्यात आली .

यावेळी जयंती महोत्सव  समितीच्या वतीने पोनि सानय , पोलिस कर्मचारी  , सरपंच , ग्राप . सदस्य , गावातील नागरिक , साठेनगर मधील  नागरिक यांचा शाल , पुष्पगुच्छ देवून समाज बांधव व जयंती महोत्सव समिती पदाधिकारी यांच्या वतीने सन्मान करण्यात आला . 


सेवानिवृत्त आदर्श शिक्षक तुकाराम शिंदे यांनी सेवापुर्ती व जनसत्ता हे डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या खंडाचे पुस्तक आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातुन आत्माराम रणदिवे यांच्या हस्ते सानप यांना भेट दिले .


नियोजित कार्यक्रच्या प्रस्ताविकात देशभक्त चे संपादक लक्ष्मण  (तात्या ) शिंदे - पाटील यांनी येथील साजरी होणारी जयंती कशा प्रकारे प्रतिवर्षी प्रोबोधनात्मक व्याख्याने , सांस्कृतिक कार्यक्रम , शालेय स्पर्धा प्रोहत्साहन पर बक्षीसे , सन्मान  अशा विविध  सार्वजनिक उपक्रमाने महामानय डॉ . बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते व सर्वच महापुरुषांच्या जयंत्या येथे साजऱ्या होत असतात याबाबत माहिती दिली  तर शेवटी आभार पुरुषोत्तम शिंदे यांनी मानले . संपन्न झालेल्या बैठकीस समाज बांधवासह गावातील नागरीकांची मोठया संख्येने  उपस्थिती होती .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.