पत्रकार रविंद्र केसकर यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा कळंब येथे तहसिलदारांना निवेदन देवून घटनेचा निषेध
संबंधित प्रकरणातील हल्लेखोरांचा तात्काळ शोध घेवून त्यांच्यावर महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायद्यान्वे कारवाईची मागणी .
कट करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न व गंभीर मारहाण करूनअडवून लटुण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्याची निवेदनाद्वारे केली मागणी .देशभक्त न्युज - कळंब / प्रतिनिधी
पत्रकार रविंद्र केसकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा कळंब तालुक्यातील पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असुन केसकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांच्या तात्काळ मुसक्या आवळुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी या मागणीचे निवेदन कळंबचे तहसिलदार विजय अवधाने यांना कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने ०२ एप्रिल रोजी देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, दि.१ एप्रिल रोजी रात्री धाराशिव येथे बेंबळी रस्त्यावर पत्रकार रविंद्र केसकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चाकुने जीवघेणा हल्ला करून तेथुन पसार झाले आहेत. केसकर यांच्यावर झालेल्या या भ्याड व प्राणघातक हल्ल्याचा कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पत्रकारांवर हल्ले होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात आला आहे. केसकर यांच्यावर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यातील हल्लेखोरांना तात्काळ शोधुन त्यांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. जेणेकरून पुन्हा अशा घटना घडणार नाहीत असे या निवेदनात म्हटले आहे.
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनावर साप्ताहिक संपादक राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण शिंदे , कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोकराव शिंदे , पत्रकार संघाचे विश्वस्त सतिशराव टोणगे , साप्ताहिकाचे संपादक नरसिंग खिंचडे , दत्ता गायके , पत्रकार बालाजी आडसुळ , शितलकुमार धोंगडे , सचिन क्षिरसागर , मेजर रामजीवन बोंदर ,मेजर एस . के . पुरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

