डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती कळंब च्या अध्यक्षपदी शिवाजी सिरसट यांची संपन्न झालेल्या बैठकीतुन निवड करण्यात आली आहे.
देशभक्त - न्युज - कळंब / प्रतिनिधी
शहरातील बालउद्यान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा परिसर या ठिकाणी माजी नगरसेवक सुनील गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यामध्ये सर्वानुमते शिवाजी सिरससट यांची निवड करण्यात आली .
उर्वरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पुढील प्रमाणे उपाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, कोषाध्यक्ष सुमित रणदिवे, सचिव सागर पटेकर, संघटक लखन हौसलमल, सुयोग गायकवाड, सहसंघटक सुरज गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख अविनाश घोडके, सल्लागार डॉ शंकर कांबळे प्रा अरविंद खांडके, सुनील गायकवाड, दिलीप कसबे, माणिक गायकवाड, सतपाल बचुटे, मुकेश गायकवाड, भाऊसाहेब कुचेकर, चरणसिंह गायकवाड, शहाजी सिरसट यांचीही यावेळी निवड करण्यात आली आहे.
संपन्न झालेल्या बैठकीत डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भीमगीत गायनाचे कार्यक्रम व्याख्यानमाला, सामान्यज्ञान स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, आदी कार्यक्रम घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. दिनांक ११ ते १४ एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
